https://www.amazon.in/bb/registration/start/?_encoding=UTF8&ref_=cct_cg_12345_1a1&pf_rd_p=9acff4bf-eee0-4854-9cca-99af421dadcf&pf_rd_r=HJNTZM43QKTMGKZ3FXDN

लातूरमध्ये बेकरीत काम करणाऱ्या तरूणाने संपवल जीवन, शेवटच्या चिठ्ठीने प्रकरणाचा उलगडा

 

लातूरमध्ये बेकरीत काम करणाऱ्या तरूणाने संपवल जीवन, शेवटच्या चिठ्ठीने प्रकरणाचा उलगडा


लातूर : लातूरमधील एका बेकरीमध्ये काम करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाने बारा नंबर पाटील परिसरात एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या पूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून याबाबत एमआयडीसी ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. चौथा आरोपी अल्पवयीन आहे. तिघांना शनिवारी न्यायालयात हजर केलं असून एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.


नांदेड जिल्ह्यातील देवापुर येथील रहिवासी असलेला तरुण प्रकाश गाडीवान हा लातूर आतील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बेकरीत मागील सहा महिन्यांपासून काम करत होता. दरम्यान त्याला सारिका अशोक आईवळे, सीमा सातलिंग वाघमारे, दशरथ तुपारे आणि एक अल्पवयीन मुलगा इतर दोघा अनोळखींनी मोबाईलच्या कारणावरून मारहाण केली. याच मारहाणीतून त्याने लातूर बार्शी मार्गावरील बारा नंबर पाटील परिसरात एका शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे शुक्रवारी समोर आले शेतकऱ्यांनी याची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली.

सुसाईड नोट समोर...

यावेळी त्याच्या खिशात आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली त्याची सहा जणांनी मारहाण केल्याचे मयत प्रकाश गाडीवान यांनी म्हटले आहे. याबाबत मयताचा भाऊ याच्या फिर्यादीनुसार सारिका आईवळे सीमा वाघमारे दशरथ तुपारे व एका अल्पवयीन मुलगा आणि इतर दोन अनोळखी अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील चौघांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्यात येईल पोलीस उपनिरीक्षक एस एम मोरे पोलीस निरीक्षक चौरे करत आहेत.

दोन अनोळखी आरोपी अटकेसाठी पोलीस मागावर

आत्महत्या करणार पूर्वी प्रकाश गाडीवान याने चिठ्ठीत नमूद केलेल्या सहा नावांपैकी दोघे अनोळखी आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत चौघांना ताब्यात घेतले असून उर्वरित दोघांना लवकरच अटक होईल यासाठी पथक रवाना करण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments