अज्ञात महिलेच्या खुनाचा उलगडा – पाच आरोपी अटक.
याबाबत अधिक माहिती अशी की,वाढवणा पोलीस ठाणे हद्दीतील चाकूर–शेळगाव फाटा मार्गावरील तिरू नदीवरील पुलाखाली अज्ञात आरोपींनी अंदाजे 20 ते 25 वयाच्या महिलेचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये टाकला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीत फेकून दिला होता. दि. 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी परिसरातील शेतकऱ्यांना उग्र वास आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटविणे अवघड झाले. त्यावरून पो.ठा. वाढवणा येथे गु.र. क्र. 230/2025 कलम 103(1), 238 भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून मिळालेली ट्रॉली बॅग (Big-Way कंपनीची), मयताने परिधान केलेली अंतर्वस्त्र (Innosence), जर्किन (IGLOO कंपनीचे), डाव्या पायातील काळा दोरा, हातातील पांढऱ्या रंगाची बांगडी, कानातील दागिने व शवविच्छेदन अहवाल यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध 5 पथके गठीत करण्यात आली.
:तपास पथकांची कामगिरी:
• पथक-1: मृतदेह ठेवण्यासाठी वापरलेल्या ट्रॉली बॅगचा उत्पादक, पुरवठादार व विक्रेते शोधून काढणे.
• पथक-2: अंतर्वस्त्र व बांगड्यांच्या उत्पादक/विक्रेत्यांकडून माहिती गोळा करणे.
• पथक-3: महाराष्ट्र, कर्नाटक सीमावर्ती जिल्ह्यांतील तसेच गुजरातमधील हरवलेल्या महिला/मुलींच्या नोंदींची पडताळणी.
या पथकाने तब्बल 300 मिसिंग मुली व 70 अपहरण प्रकरणांची माहिती तपासली.
• पथक-4: सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचे विश्लेषण, प्रसारमाध्यमे व सोशल मीडियाद्वारे माहिती प्रसिद्ध करणे, मृत महिलेचे एआय स्केच तयार करणे व औद्योगिक भाग, साखर कारखाने, डाळ मिल परिसरात चौकशी करणे.
• पथक-5: ह्यूमन इंटेलिजन्सच्या आधारे मागील काही दिवसांपासून बेपत्ता झालेल्या महिलांची गुप्त माहिती गोळा करणे.
दरम्यान पोलीस अधीक्षक अमोल तांबे हे नमूद पथकांनी केलेल्या कारवाईचा वेळोवेळी आढावा घेऊन त्याप्रमाणे पुढील रणनीती तयार करून पुढील कारवाई संदर्भात सूचना व मार्गदर्शन करत होते.
पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे पथकाकडून उदगीर, अहमदपूर, चाकूर येथील एमआयडीसी तसेच साखर कारखान्यामध्ये, डाळ मिल मध्ये काम करणाऱ्या कामगारांची त्यांच्या कुटुंबीयांची गोपनीय पद्धतीने माहिती मिळविण्यात येत होती. दरम्यान एका साखर कारखान्यात मेन्टेनन्स चे काम करणाऱ्या कुटुंबीयांवर त्यांच्या हालचालीवर पथकामार्फत लक्ष ठेवण्यात येत होते. कुटुंबातील एक महिला काही दिवसा अगोदरच अचानक गायब झाल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पथक त्या महिलेच्या पतीच्या संशयीत हालचालीवर लक्ष ठेवून होते. संशयीत पतीने त्याचे बिंग फुटूनये म्हणून तो उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे आपल्या पत्नीचा फोटो घेऊन पत्नीची मिसींग दाखल करण्यासाठी आला असता पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी व सदर महिलेच्या फोटोची व नमुद गुन्ह्यातील रेखाचित्राची पडताळणी केली तेव्हा त्यांचा संशय बळावल्याने त्यांनी पोलीस ठाण्याच्या पथकाद्वारे पतीचे सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले.
त्याच्याकडे अधिक विचारपूस करता त्याच्याकडून माहिती मिळाली की, तो उत्तर प्रदेश मधील बडा सिक्किटा, जिल्हा कुशीनगर, उत्तर प्रदेश असे असल्याचे सांगून नमूद गुन्ह्यातील मयत ही त्याची पत्नी असून त्याचे नाव फरीदा खातून, वय 23 वर्ष असे असल्याचे सांगितले.
नमूद मयत ही मुलांसह उत्तर प्रदेशात राहत होती. जिया ऊल हक यास त्याची पत्नी फरीदा हिचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यांच्यात नेहमी भांडण होत होते. नमूद मयत फरीदा ही काही दिवसापूर्वीच मुलांसह जीया उल हक याच्याकडे राहण्यास आली होती. जिया उल हक साखर कारखान्याने दिलेल्या खोलीत राहत होता. फरीदा हीच्या चारित्र्यावर संशय असल्याने जिया उल हक याने पत्नी फरिदा हिचा खून करण्याचा त्याच्या इतर साथीदारासोबत मिळून कट रचला. 15 ऑगस्ट रोजी साखर कारखान्यातील कामगारांची सुट्टी असल्याने जिया उल हक याने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी असताना आपल्या साथीदाराच्या मदतीने मयत फरीदाच्या छातीवर बसून उशी तोंडावर दाबून गुदमरून श्वासोश्वास रोखून फरीदाचा खून केला व त्यानंतर फरीदाचा मृतदेह रॅली बॅगेत ठेवून स्थानिक ऑटो भाड्याने घेऊन साथीदारासह निघाला. वाटेत पुलाजवळ फरिदाचा मृतदेह असलेली ट्रॉली बॅग नदीत फेकून दिली. त्यावरून सदर पथकांनी तात्काळ वेगवान कारवाई करत काही तासातच गुन्ह्यातील मुख्य आरोपी व गुन्ह्यात मदत करणारे त्याचे अन्य
अटक आरोपी :-
1. जीया उल हक (वय 34 वर्ष)
2. सज्जाद जरूल अन्सारी (वय 19 वर्ष)
3. अरबाज जमलू अन्सारी (वय 19 वर्ष) – सर्व रा. बडा सिक्किटा, जि. कुशीनगर, उ.प्र.
4. साकीर इब्राहिम अन्सारी (वय 24 वर्ष) – रा. विजयपूर, ता. तमकोइराज, जि. कुशीनगर, उ.प्र.
5. आजम अली सजवाल अली उर्फ गुड्डू (वय 19 वर्ष) – रा. विजयपूर, ता. तमकोइराज, जि. कुशीनगर, उ.प्र.
असे असून सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.
नमूद गुन्ह्यामध्ये काही एक विशेष माहिती नसतानाही पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पथकांना वेळोवेळी केलेल्या सूचना व मार्गदर्शनामुळे तसेच पोलीस अधिकारी व अमलदारांच्या पथकांनी अथक परिश्रम घेऊन काहीएक उपयुक्त पुरावा व माहिती नसतानाही सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपीतास आज रोजी मा.न्यायालयसमोर हजर केले असता त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
सदरची कामगिरी अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर, यांचे मार्गदर्शनात मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर, अरविंद रायबोले उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर, गजानन भातलवंडे उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर यांच्या नेतृत्वातील पथकामधील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, तसेच
पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक देवकर, पोलीस अमलदार नामदेव चेवले , राजकुमार डबेटवार, सचिन नाडागुडे, महेबूब सय्यद, युवराज जाधव, राजकुमार देवडे , संदीप केंद्रे, राम बनसोडे, रवी चिमुले, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे, रियाज सौदागर, विनोद चलवाड, साहेबराव हाके, अर्जुन रजपूत, संजय कांबळे, सुरेश कलमे, दिनेश देवकते, सिद्धेश्वर मदने, गणेश साठे, मनोज खोसे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड, जमीर शेख, बंडू नीटूरे, चंद्रकांत केंद्रे, प्रदीप चोपणे सायबर सेलचे पोलीस अंमलदार शैलेश सुडे यांनी केली आहे.
0 Comments