पुणे : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रे'दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने आक्रमक भूमिका घेत ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. पुणे शहरातही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने सारसबाग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापाशी आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात येणार होते. मात्र आंदोलनात सहभागी असलेल्या एका महिला कार्यकर्त्याने मात्र थेट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेलाच जोडे मारण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात काहीच योगदान नव्हतं असा दावा करत राहुल गांधी यांनी टीकेची झोड उठवली आहे. 'सावरकर दोन-तीन वर्ष अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहिले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे,' असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे.
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुण्यात आंदोलन करताना सावरकरांच्या फोटोचा विसर पडला. राहुल गांधी यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करताना त्यांनी अचानक सावरकरांच्या फोटोवरच चप्पल उगारली. pic.twitter.com/Wlrj3jNGIW
— Maharashtra Times (@mataonline) November 17, 2022