लातूर: जिल्ह्यातील औसा तालुक्यात असणाऱ्या आशिव या गावी ४० वर्षीय सुधीर शंकर बंडगर आपल्या कुटुंबासोबत राहत होते. १५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी त्यांचे पतीसोबत किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर जोरदार भांडणात झाले. त्यामुळे त्यांची १५ वर्षीय मुलगी आई-वडिलांचे भांडण सोडविण्यासाठी मधे पडली. मात्र राग अनावर झालेल्या बापाने एक दगड मुलीच्या दिशेने भिरकावला. तो दगड तिच्या डोक्यावर लागला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन ती खाली कोसळली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टर तिचा जीव वाचविण्यात अपयशी ठरले.
दरम्यान, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून प्रत्यक्ष साक्षीदार तपासून गुन्ह्याचे दोषारोपपत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले होते. या भक्कम पुराव्यामुळे ही केस अंडर ट्रायल चालविण्यात आली.
पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात गोळा केलेले साक्षी,पुरावे तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी वडील शंकर बंडगरला दोषी ठरवत दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
Tags
लातूर