लातूर परिसरात भूकंपाचे धक्के; भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी
लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले असून विशेष म्हणजे या धक्क्याचे केंद्र हे देखील पुन्हा किल्लारी परिसर असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली आहे.
हा भूकंप सौम्य प्रमाणात २.४ रिस्टर स्केल नोंदवण्यात आला असल्याचेही आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले आहे. शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजून सात मिनिटांनी हे धक्के किल्लारी आणि परिसरात जाणवले
सुमारे पाच किलोमीटरचा परिसर या धक्क्यामुळे हादरला. या भूकंपामुळे किल्लारी मध्ये झालेल्या १९९३ मध्ये भूकंपाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. १९९३ मध्ये सप्टेंबर महिन्यात ३० तारखेला प्रलयंकारी भूकंप झाला होता. एकेकाळी महाराष्ट्रच नाही तर देशाला हादरवणा-या भूकंपाच्या आठवणी आज नव्याने जागी झाल्या आहेत.
Tags
लातूर