दिवसभरातील ताज्या घडामोडी
😎 राज्यात गुलाबी थंडीची एन्ट्री... :
राज्यात पुणे, सातारा, नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान घसरलं. महाबळेश्वरात तापमान 10.4 अंशांवर पोहोचलंय. तर वेण्णालेक 6 अंशांवर घसरलंय. तिकडे धुळ्यातही तापमानात घट झालेय. धुळ्यात तापमान 8.2 अंशांवर पोहोचलंय. नाशिकमध्येही हुडहुडी भरलेय. तर पुण्यातही थंडीची चाहुल लागल्यानं पुणेकरांचे स्वेटर्स, कानटोप्या कपाटातून बाहेर निघाल्या आहेत. रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्यानं शेतकरी आनंदला आहे.
🗣️ रणजीत सावरकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी राहुल गांधींविरोधात निषेध नोंदवण्यासाठी थेट शेगांवला निघाले. मात्र त्यांना सभेत जाऊन देण्यात आले नाही. असे असले तरी, सावरकरांबद्दल असलेला आदर दाखवून थेट राहुल गांधींना जाब विचारायला गेल्याने रणजीत सावरकर यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले. याच मुद्द्यावर आज, रणजीत सावरकर यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले.
💸 खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण :
'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कार्यकर्त्यांनी पैसे उधळल्याचे समोर आले आहे. औरंगाबादमध्ये हा प्रकार घडला. जलील यांच्यावर नोटा उधळल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याची खुसखुशीत चर्चा सुरूय. औरंगाबादमधील आमखास मैदानावर दुवा फाउंडेशनतर्फे इम्तियाज जलील उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शुक्रवारी रात्री उशिरा सुफी कव्वालीचा कार्यक्रम रंगला.
😳 सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला भुमरेंचं उत्तर :
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात सभा घेत भुमरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच भुमरे यांनी मतदारसंघात विकासकामे करण्यापेक्षा दारूच्या दुकाने थाटण्याचे कामं केल्याचं अंधारे म्हणाल्यात. तर अंधारे यांनी केलेल्या याच आरोपाला भुमरे यांनी उत्तर दिले. रात्रीच्या सुमारास आलेल्या आणि अर्ध्यातासाच्या दौऱ्यात सुषमा अंधारे यांना पैठणचा विकास कसा दिसणार असं भुमरे म्हणाले आहे.
😇 जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात :
जगभरात मंदीचे ढग दाटू लागले आहेत. शेअर बाजारात अस्थिरतेच्या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरु केली आहे. एकीकडे जेट एअरवेज पुन्हा सुरु करण्याची योजना असताना या कंपनीच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आलीय किंवा त्यांना बिनपगारी रजेवर पाठवण्यात आलंय. कंपनीचे सीईओ संजीव कपूर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.