MIM खासदार इम्तियाज जलील यांच्यावर उधळले पैसे
खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून औरंगाबादमध्ये सध्या विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. अशाच एका कार्यक्रमात इम्तियाज जलील यांच्यावर त्यांच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी पैसे उधळले आहेत. यावेळचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
औरंगाबादमधल्या आमखास मैदानावर एक कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जलील यांच्यावर पैसे उधळण्यात आले. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण जलील यांच्यावर पैसे उधळल्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी खुलताबादमधल्या एका अशाच कार्यक्रमात जलील यांच्यावर कार्यकर्त्यांनी पैसे उधळले होते, तर एका लग्नातही हे घडलं होतं.
Aimim Aurangabad MP @imtiaz_jaleel sahab..
— Musa Bashamlool (@Musa_bashamlool) November 18, 2022
IJ Fest
Mehfil-e-sama
Sufi & Qawwalli Night
At Aam khass Maidan#ijfest2022 pic.twitter.com/MqRu626ARC
Tags
ताज्या बातम्या