पुस्तकामुळे मानवी जीवनाला दिशा मिळते – पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे (IPS)
पुस्तकामुळे मानवी जीवनाला दिशा मिळते – पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे (IPS)
लातूर : दयानंद कला महाविद्यालयात आय क्यू ए सी आणि करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता अकरावी ते एम ए पर्यंतच्या गुणवंत एकूण 437 विद्यार्थ्यांना गोल्ड कार्ड चे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना ग्रंथालयात मुक्त संचार करता यावा या हेतूने महाविद्यालयाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना असे म्हणाले की, माझ्या आई-वडिलांची भूमिका ही मी वैद्यकीय शाखेत जावे असी होती परंतु काही पुस्तके माझ्या जीवनामध्ये आली आणि त्यामुळे मी आयआयटी क्षेत्राकडे वळलो. आयआयटी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला चांगल्या पगाराची नोकरी पण मिळाली होती पण त्याही वेळी पुस्तकाच्या वाचनातून मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो आणि दुसऱ्या प्रयत्नात मी हे यश संपादन केले. विद्यार्थी जीवनामध्ये पुस्तकांना अधिक महत्त्व दिले पाहिजे, त्याच्या वाचनातून कधी व केव्हा प्रेरणा मिळेल हे सांगता येत नाही. इंटरनेटच्या माध्यमातून कितीही ज्ञान उपलब्ध होत असले तरी त्यास मानवी मन नसते पुस्तकांच्या वाचनातून त्याला होणारा स्पर्श त्यातून एक वेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण होत असतात त्या पुस्तकातली पात्र ही आपल्या जीवनामध्ये उमटत असतात म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये विद्येच्या पाठीमागे लागले पाहिजे, पुस्तकामुळेच मानवी जीवनाला दिशा मिळते असे भावपूर्ण उद्गार यांनी काढले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. लक्ष्मीरमण लाहोटी हे होते अध्यक्षीय समारोपात त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकेत रात्री अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्था पालकांची भूमिका बजावेल, अभ्यास करताना थकवा येऊ नये म्हणून चहाची, रात्री एक पर्यंत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना भूक लागली तर नाष्ट्याची व्यवस्था सुद्धा संस्था करेल असे मत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमासाठी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. रमेशजी बियाणी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, गोल्ड कार्ड समितीचे समन्वयक डॉ. अंकुशकुमार चव्हाण, करिअर कट्टा लातूर जिल्हा समन्वयक डॉ. शिवकुमार राऊतराव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे यांनी केले, स्वागत गीत यशश्री पाठक, श्री आदिराज जगदाळे व त्यांच्या समूहाने सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्योतिबा बडे व कु. प्रतीक्षा पाटवकर यांनी केले तर आभार डॉ. शिवकुमार राऊतराव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments