सकाळच्या टॉप घडामोडी : 8 डिसेंबर 2022
सकाळच्या टॉप घडामोडी : 8 डिसेंबर 2022
▪️ RBI ने व्याजदरात केली 0.35% वाढ: 20 वर्षांच्या 30 लाखांच्या कर्जावर 1.55 लाख रु जास्त द्यावे लागतील
▪️ भाजप 15 वर्षानंतर MCD सत्तेतून बाहेर: भाजप 104, आप 134 जागा; केजरीवाल म्हणाले- पीएम मोदींच्या सहकार्याने विकास करू
▪️ लोकसभेत गाजला सीमावादाचा मुद्दा: सुप्रिया सुळे म्हणाल्या- कर्नाटकी मुख्यमंत्र्यांच्या तोंडी महाराष्ट्र तोडण्याची भाषा, हे चालणार नाही!
▪️ बाॅम्बे हायकोर्टाचे नाव महाराष्ट्र राज्य उच्च न्यायालय करा: भाजप खासदार गोपाळ शेट्टींची लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात मागणी
▪️ PM किसान सन्मान निधी: आधार लिंक करताच 1.88 कोटी शेतकरी 6 हजार रुपये लाभाच्या योजनेतून बाहेर, लाभार्थी 8.58 कोटींंवर
▪️ थेट राज्यपालांच्या खुर्चीसमोर मॉडेलचे फोटोसेशन: नव्या वादाला फुटले तोंड, मायरा मिश्रा नावाजलेली TV अभिनेत्री
▪️ सीमावादावर बोलले राज ठाकरे: संघर्ष न करता मैत्री टिकवण्यातच सर्वांचे हित; कर्नाटक - महाराष्ट्र सरकारला आवाहन
▪️ संजय राऊतांनी तोंड आवरावे: शिंदेंविरोधात अपशब्द सहन करणार नाही, जशास तसे प्रत्यूत्तर देऊ; मंत्री शंभूराज देसाईंचा पलटवार
▪️ कर्णधार रोहित शर्माची झुंज अपयशी! बांगलादेशची भारतावर 5 धावांनी मात, मालिकेत 2-0 विजयी आघाडी
▪️ IMDb ने जाहीर केली पॉप्युलर इंडियन सेलेब्सची लिस्ट: पहिल्या स्थानावर धनुष; सुपरस्टार यश, आलिया आणि सामंथा यांचाही समावेश
No comments