Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    फत्तेपुरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा संसर्ग व इतर आजारामुळे २५ जनावरे दगावली



     फत्तेपुरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा संसर्ग व इतर आजारामुळे २५ जनावरे दगावली


    पशुपालकांचे लाखोचे नुकसान,भिती कायम,२० दिवस पशुकरिता खडतर 



    औसा

    मागील २० ते २५ दिवसांचा काळ फत्तेपुर येथील पशुपालकांकरिता खडतर गेला.पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेण्यासह पाणी, चाऱ्यासह इतरामुळे झालेल्या संसर्गामुळे १८ तर इतर आजाराने ७ अशी तब्बल २५ जनावरे दगावली.त्यांची भिती आजही येथील पशुपालकात कायम असून एकीकडे आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या शेतकऱ्यांचे पशु दगावल्याने दुहेरी धक्का बसला.शासनाकडून कसलेही मदत मिळाली नसल्याने संकटात असलेल्या पशुपालकांकडून मदतीची मागणी होत आहे.


    यशवंत नगर म्हणजेच औसा-उमरगा राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ माळरानावर येथील काही नागरिक भुकंपानंतर येवून राहिले होते.या गावात दुधाच्या पशुची संख्या जास्त असून शहर जवळ असल्याने बहुतांश शेतकरी दुधांचा जोड व्यवसाय करतात.चार वर्षापूर्वीच्या गणनेनुसार  गयी वर्गाचे ४७१,म्हैस १७१,शेळ्या १३५ पशुची नोंद असून काही दिवसापूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने जनावराला चावा घेतला.यासह त्या संसर्गजन्य कुत्र्यासह बाधित पशुमुळे पाण्याचे हौद,चारा,यासह इतर ठिकाणाहुन रेबीजचा संसर्ग पसरुन इतरांना लागण झाली. एक ते दोन दिवसातच पशु दगावत होते.त्या जनावरात चारा खाणे बंद,जिभेला काटे येणे,कान-डोळे तटारणे,पुढच्या पायाने माती उकरने,एकटख बघणे,ताप येणे,मारण्यासाठी अंगावर येणे,यासह उभारल्या ठिकाणीच खाली पडणे असे लक्षणे दिसून आली.दुधाच्या गाईसह म्हैस,वासरूचे प्रमाण अधिक होते.वरील लक्षणामुळे १८ तर ताप येवून इतर आजारामुळे ७ पशु दगावले.यात पवन साळुंके,श्रीरंग जोगी,विजयकुमार यादव,प्रकाश धानुरे,रमेश कांबळे,खंडू अडसुळे,रतन चांदुरे माधव मुगळे,शिवशाम माळी,विलास धानुरे,उत्तम धानुरे,लक्ष्मीबाई साळुंके,नामदेव माळी,शामराव पाटील,बालाजी चांदुरे,कडाजी राऊत,महेबूब शेख,बालाजी साळुंके,इमाम शेख या शेतकऱ्यांच्या पशुचा समावेश आहे.


    मयत पशुचे शवविच्छेदन नाही

    ----------------------------------

    फत्तेपुरात दगावलेल्या पशुचे शवविच्छेदन करण्यात आले नाही.फक्त एक ते दोन जनावरांची पशु पर्यवेक्षकाडून पाहणी करण्यात आली.या पशुपालकावरील कठिण समयी कुणीही जनावरे वाचवण्यासाठी किंवा उपचारासाठी पुढे आले नाही.वेळ गेल्यावर सर्वच आले,पण याचे जनावरे वाचवू शकले नाहीत.परिणामी दररोज एक दोन पशु दगावत गेले,लाखमोलाचे पशुधन शेतकरी जमिनीत पुरत होते.यशवंत नगर मध्ये हा दररोजचा नित्यनेमाने काम २५ दिवस चालले.शासनाच्या नियमात बसत नसले तरीही पशुपालकांना मदत करावी, अशी मागणी पवन साळुंके, श्रीरंग जोगी,विजयकुमार यादव यांच्यासह वरील शेतकऱ्यांनी केली.


    शक्यते प्रयत्न केले,लसीकरण ही करुन पशु दगावलेच

    ------------------------------

    मागील महिन्याभराचा काळ फत्तेपुर येथील पशुपालकांकरिता कठीण होता.रेबीजसह दंत,थंडी व गोचीडांच्या प्रादुर्भावामुळे २५ जनावरे दगावली.आम्ही गावात जावून प्रयत्न केला. पण पिसाळलेल्या कुत्र्यांचा संसर्ग वाढल्याने ते आटोक्यात आले नाही. यासह २८ नोव्हेंबर रोजी बैठक घेवून जनतेला माहिती दिली.यासह २९ नोव्हेंबर रोजी दंताचे लसीकरण केले.लम्पीचे येथे एकही रुग्ण पशु नसल्याचे पशु पर्यवेक्षक किशोर जाधव यांनी सांगितले. मयत जनावरांचे शवविच्छेदन केले नाही, असे त्यांनी सांगितले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad