दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
⚡ अनिल देशमुखांचा जामीन मंजूर, पण...
100 कोटी वसुलीचे आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. पण सीबीआयची जामिनाला दहा दिवस स्थगिती देण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. गेल्या तेरा महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या देशमुख यांचा आणखी काही दिवस मुक्काम तुरुगांत वाढला आहे. देशमुख यांना या आधी ईडीच्या गुन्ह्यात जामीन मिळालेला आहे.
📝 महापुरुषांचा अनादर करुच शकत नाही : राज्यपाल
राज्यातून सुरु असलेल्या विरोधानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहलंय. त्यात राज्यपाल म्हणतात की, महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करु शकत नाही. माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केलंय असं पत्रात म्हटलंय.
😎 भूपेंद्र पटेलांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
गुजरात विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला आहे. या सोहळ्यात पंतप्रधान मोदीही सहभागी झाले आहेत. भूपेंद्र पटेलांनी सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
💥 48 विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणारी बस उलटली
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात रविवारी रात्री विद्यार्थ्यांची बस उलटली. ही बस 48 जणांना घेऊन लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेनं चालली होती. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून घाट उतरताना ही बस उलटलीय. या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर सहा विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीय.
🏏 सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियावर विजय
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्याचा थरार रंगला. अखेर सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा चार धावांनी पराभव करत विजय मिळविला. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 1-1 ने बरोबरी साधलीय. सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करत भारताने 20 धावा केल्या. 21 धावांचा पाठलाग करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघ 16 धावा काढू शकला.
No comments