Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    मुरुड ग्रामपंचायतची निवडणूक म्हणजे मटणाच्या ताटलीवर, दारूच्या बाटलीवर ?






     मुरुड ग्रामपंचायतची निवडणूक म्हणजे मटणाच्या ताटलीवर, दारूच्या बाटलीवर ?

     गावातील अस्वच्छतेच्या साम्राज्यला जबाबदार कोण?


    मुरुड प्रतिनिधी:-  लातूर जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणजे मुरुड ग्रामपंचायतीचा उल्लेख केला जातो,दर पाच वर्षाप्रमाणे या ग्रामपंचायतीच्या शासन प्रशासनाकडून निवडणुका घेतल्या जातात निवडणुकीचा डंका वाजला की हवसे नवसे गवसे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतात.  गावात ग्रामपंचायतची निवडणूक असल्यामुळे पक्षीय राजकारण नसतं पण पॅनल मात्र असतं मग प्रस्थापित नेतृत्व आपले सतरा सदस्य उभा करतात आणि या प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधामध्ये जसे की आय काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि छोटे मोठे पक्ष एकत्र येऊन प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढतात पण या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सध्या वेगळंच चित्र दिसून येत आहे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं त्या दृष्टिकोनातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य दिलीप दादा नाडे यांनी काँग्रेस,शिवसेना, यांचे काही सदस्य घेऊन १७ सदस्यांचं पॅनल  पॅनल बनवला आहे". नेहमी प्रमाणे याही ..निवडणुकीत नेहमीप्रमाणे ढाबा, दारू, बुक करताना दिसत आहेत, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात दरवेळेस प्रमाणे गल्लोगल्ली फिरून हजाराच्या पाचशेच्या नोटा  वाटताना कार्यकर्ते दिसत आहेत याही वेळेस हाच कार्यक्रम चालणार का ? ग्रामपंचायतची निवडणूक म्हणजे मटणाच्या ताटलीवर, दारूच्या बाटलीवर आणि हजाराच्या नोटावर राहणार काय असा सवाल मात्र मुरुड नागरिकांमध्ये दिसून येत अशी चर्चा मात्र नागरिकात दिसून येत आहे.

    देशपातळीपासून ते गावपातळीपर्यंत स्वच्छतेकरिता प्रत्येक गावाकरिता लाखो, करोडो रुपयांचा निधी वितरीत केल्या जातो. अन तो निधी नागरिकांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने केला जातो. मात्र, त्या निधीची विल्हेवाट  स्वच्छतेच्याच दृष्टीने करणे हे काम स्थानिक प्रशासनाचे असते व त्या निधीतून शहर स्वच्छतेवर भर देणे हे कामही तेवढेच महत्त्वाचे असते."  मुरुड मध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य गेले पाच वर्ष अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या जीवाशी स्थानिक प्रशासन खेळत आहे का ? असा प्रश्न नागरिकात उद्भवत आहे. लातूर तालुक्यातील मुरुड शहर हे महाराष्ट्रातील एक नंबरची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून विख्यात आहे तसेच बाजारपेठ परिचित आहे. तसेच बाजारपेठेमध्ये शमशानभूमी मध्ये अतिशय घाण व अस्वच्छता निर्माण झालेली आहे व येणारे व्यापारी , नागरिकांना याचा अतिशय त्रास होत असून याकडे जिल्हा परिषद पंचायत समिती व स्थानिक प्रशासन व प्रशासक याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. यामध्येच निवडणुकीचे मात्र वेगळेच चित्र निर्माण झालेली आहे गेले पाच वर्ष झाली तरीही स्वच्छता झाली नाही कोणत्याही पंचाने याकडे लक्ष वेधले नाही. 

     'स्वच्छ भारत...स्वच्छ शहर'चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडूनआवाहन करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र,  मुरुड शहराची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे रोगराईची धास्ती अन शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे.

    स्वच्छतेवर किती खर्च होतो? मात्र,  मुरुड शहराला निधी तर मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे शहरातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते. शहरातील अनेक भागातील नाल्या या घाणीने तुडूंब नाली आहे की? नाही का बुजवली , पाईप लाईन मुळे भरलेल्या असून ते घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. तर काही ठिकाणी कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचं काम करीत आहे. शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे स्वच्छतेबाबत किती जागृत आहे हे दाखवून देते. शहरातील असलेली अस्वच्छता पाहता एखाद्या अन्य संसर्गजन्य आजाराने तोंड वर काढल्यास याचे विपरीत परिणाम हे कोरोना काळात  शहरवासियांना परिचित आहे . तेव्हा शासनाच्या लाखो-करोडो रुपयांच्या स्वच्छतेकरिता येणाऱ्या निधीचा काय उपयोग? अन येणारा निधी स्वच्छतेच्या उपाययोजनांवर खर्च न करता तो कोठे खर्च होतो? हे मुरुड शहराच्या अस्वच्छतेच्या परिस्थितीवरून स्पष्टच होत. अशी चर्चा नागरिकात होत असून यात शासन प्रशासन यांना वारंवार मागणी होत आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad