Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    व्हॉईस ऑफ मीडियाची चाकूर तालुका कार्यकारिणी जाहीर






    व्हॉईस ऑफ मीडियाची चाकूर तालुका कार्यकारिणी जाहीर

    तालुकाध्यक्षपदी विनोद निला, तर सरचिटणीस संग्राम वाघमारे

    लातूर / प्रतिनिधी
    व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेची चाकूर तालुका कार्यकारिणी जल्हिाध्यक्ष बालाजी फड व जल्हिा कार्याध्यक्ष शहाजी पवार आणि सुशांत सांगवे यांनी जाहीर केली आहे. या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी पत्रकार विनोद निला यांची, तर सरचिटणीसपदी संग्राम वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्हा कार्यकारिणीवर सदस्य म्हणून प्रा. सुधाकर हेमनर यांची निवड केली आहे.
    'लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा' असे ब्रीद घेऊन राष्ट्रीय पातळीवर स्थापन झालेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे जाळे अवघ्या वर्षभरात महाराष्ट्रासह २१ राज्यांमध्ये पसरले आहे. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिणीस चंद्रमोहन पुप्पाला, राज्य अध्यक्ष राजा माने व मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या सूचनेवरुन चाकूर तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अध्यक्षपदी विनोद निला, कार्याध्यक्षपदी प्रशांत शेटे यांच्यासह उपाध्यक्षपदी माधव तरगुडे व राजकुमार जगताप, सरचिटणीसपदी संग्राम वाघमारे, सहसरचिटणीसपदी संजय पाटील, खजिनदार/कोषाध्यक्षपदी प्रा. अ. ना. शिंदे, कार्यवाहकपदी बापुराव माने, संघटकपदी सुशील वाघमारे, प्रसद्धिी प्रमुखपदी गणेश स्वामी, तर सदस्य म्हणून दयानंद सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad