दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
👁️ शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील सिल्व्हर ओक येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. देशी कट्ट्याने ठार मारू, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने दिला आहे. शरद पवारांचा काल (सोमवारी, 12 डिसेंबर) वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी पवारांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
🗣️ नागपूर अधिवेशनाबाबत अजित पवारांची ही मागणी
आजच्या विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी हे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे असं त्यांनी सांगितलं.
😇 माजी आमदार शिवाजी कर्डिलेंकडून सुवेंद्र गांधींना धमकी!
भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले व बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथील देवीच्या देवस्थानचा कारभार पाहत असलेले भगत कुटुंबातील वाद आणखी चिघळला आहे. त्यात भगत कुटुंबाला माजी खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र गांधी हे मदत करत असल्यावरून कर्डिले हे चिडले आहेत. त्यांनी थेट सुवेंद्र गांधी यांना फोन करून धमकी दिली. याबाबत अॅड. अभिषेक भगत यांनी पोलिसांकडे तक्रारही केली आहे.
😎 ..आणि रोहित पवार थेट बेळगावात गेले!
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आता बेळगावात गेले आहेत. ते बेळगावात गेल्यानंतर तेथील मुख्य असलेल्या राणी चन्नमा चौकात जाऊन फोटो शेअर केला आहे. याचबरोबर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे. यावर रोहित पवार म्हणाले की, मी मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्दावर आरोप प्रत्यारोप केल्याचे ऐकत आहे. परंतु बेळगाव हा कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात असल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
✔️ ट्विटरकडून बिझनेस ब्रँड्ससाठी 'गोल्ड टिक सुविधा'
ट्विटरने बिझनेस ब्रँड्ससाठी गोल्ड व्हेरिफिकेशन चेकमार्क लॉन्च केले आहे. सोमवारपासूनच ब्रँड प्रोफाइलला नवीन टिक मार्क देण्यात आले आहेत. ट्विटरने गोल्ड टिक ही कंपन्यांसाठी लॉन्च केली आहे. तर ग्रे टिक राजकीय किंवा सरकारी संस्थांसाठी आहे. दरम्यान ट्विटरचे पेड-फॉर व्हेरिफिकेशन फीचर सोमवारी पुन्हा एकदा सुरू झाले आहे.
No comments