शाहरुख खानला जिवंत जाळेन, पठाण सिनेमावर अयोध्येच्या संत परमहंस दासांनी दिली धमकी

 


शाहरुख खानला जिवंत जाळेन, पठाण सिनेमावर अयोध्येच्या संत परमहंस दासांनी दिली धमकी


अयोध्या : बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या पठाण या चित्रपटाबाबत देशभरात निदर्शनं सुरू आहेत. यूपीमध्ये या सिनेमाविरोधातील आंदोलनं थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्याचबरोबर अयोध्येतील ऋषी-मुनींनीही पठाण चित्रपटाविरोधात आघाडी घेतली आहे. अयोध्येतील तपस्वी छावणीचे संत महंत परमहंस दास यांनी अभिनेता शाहरुखबाबत मोठे वक्तव्य केले आहे. जर मला जिहादी शाहरुख मला भेटला तर मी त्याला जिवंत जाळून टाकेन. यासोबतच पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले.

    शाहरुखबद्दलच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे महंत परमहंस दास यांचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. 'पठाण सिनेमात आमच्या भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला', असे ते म्हणाले. 'आमचे सनातन धर्माचे अनुयायी याला सातत्याने विरोध करत आहेत. आज आपण शाहरुख खानचे पोस्टर जाळले, मी त्याचा शोध घेत आहे. जिहादी शाहरुख खान कुठे सापडला तर त्याला जिवंत जाळून टाकेन.' यासोबतच परमहंस दास यांनी असेही म्हटले की, 'जर कोणी ते जाळण्याचे धाडस केले तर मी स्वतः त्याचा खटला लढेन.'



    पठाण सिनेमात दीपिकाने भगवी बिकिनी का घातली?


    याआधी अयोध्या हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी पठाण सिनेमाबाबत म्हटले होते की, शाहरुखने सनातन धर्माची अनेकदा खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, पठाण सिनेमात दीपिकाने भगव्या पोशाखात बिकिनी घालून नग्न प्रदर्शन करण्याची किंवा लोकांच्या भावना दुखावण्याची काय गरज होती. याबाबत महंत राजू दास यांनी प्रेक्षकांना पठाण सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. ज्या थिएटरमध्ये पठाण दाखवला जाईल ते जाळून टाका असेही त्यांनी सांगितले.

    पठाण सिनेमाचा एवढा वाद का?

    पठाण सिनेमातील 'बेशरम रंग' हे गाणे रिलीज झाल्यानंतर शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांना सातत्याने विरोध होत आहे. दीपिकाने या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घातली असून तिने शाहरुखसोबत काही बोल्ड सीन्सही दिले आहेत. त्यामुळे केवळ पठणवर बहिष्काराचीच मागणी होतेय असं नाही तर सिनेमाचा निषेधही केला जात आहे.

    Post a Comment

    Previous Post Next Post