परळीत फिल्मी स्टाईल हाणामारी; खुर्च्यांची मोडतोड - latursaptrangnews

Breaking

Tuesday, December 20, 2022

परळीत फिल्मी स्टाईल हाणामारी; खुर्च्यांची मोडतोड

 


परळीत फिल्मी स्टाईल हाणामारी; खुर्च्यांची मोडतोड


बीड : परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. रासपचे युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. राजाभाऊ फड हे रासपचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या राजाभाऊ फड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजाभाऊ फड हे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात तुबळ हाणामारी झाली. या हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात हाणामारीचा प्रकार घडला. ही हाणामारी फिल्मी स्टाईल प्रमाणं झाल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. परळीत झालेल्या तुंबळ हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत. यामध्ये परळी तालुक्यातील कन्हेरवाडी गावचे सरपंच राजाभाऊ फड व इतर दोन जणांवर हल्ला झाला आहे. या जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलंय.

परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात तुफान राडा झाल्यानंतर रासप युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. राजाभाऊ फड यांचे अंगरक्षक आणि पुतण्या जखमी झाला आहे. राजाभाऊ फड यांच्या गाडीच्या काचा फोडल्या गेल्या आहेत.

जखमींवर सध्या स्वराती रुग्णालयात उपचार चालू आहेत. मात्र, या हाणामारीत तीन जण गंभीरित्या जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, काही जणांना परळीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, हाणामारीची घटना घडल्यानंतक परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आत्तापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाले नसल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

खुर्च्यांची तोडफोड
परळीमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दोन गट आमने सामने आले. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्लाबोल केला. भीषण हाणामारीत तिघं जण जखमी झाले आहेत. ज्या ठिकाणी हाणामारी झाली तिथं खुर्च्यांची तोडफोड झाल्याचं दिसून आलं.

No comments:

Post a Comment