दिवसभरातील ताज्या घडामोडी

दिवसभरातील ताज्या घडामोडी 



🗣️ दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरेंनी सोडले मौन : 


राज्यभरात पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरण चर्चेत आलं असून या सर्व आरोपांवर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडत विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. काय म्हणाले आदित्य ठाकरे? ज्या दिवशी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता, त्यादिवशी माझ्या आजोबांचं निधन झालं होतं. त्यामुळे मी रुग्णालयात होतो. त्यांना काढायचं ते काढून द्या. पण, सत्य आहे 32 वर्षांच्या तरुणाला हे सरकार घाबरलं आहे. 


🥳 सरकारकडून शिक्षकांना खास ख्रिसमस गिफ्ट :


राज्यातील शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात 12 वर्षांनंतर मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना सरकारकडून खास ख्रिसमस गिफ्ट मिळाले आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षण सेवकांचे मासिक मानधन हे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या प्रवर्गांना आधी अनुक्रमे 6 हजार, 8 हजार, 10 हजार अशा प्रकारे मासिक मानधन मिळत होत. आता सुधारित मासिक मानधनाप्रमाणे राज्यातील शिक्षण सेवकांना 6 ऐवजी 16 हजार, 8 ऐवजी 18 हजार, 10 ऐवजी 20 हजार अशा प्रकारे मासिक मानधन मिळणार आहे. 


😎 राज ठाकरेंनी नागपुरात मुख्यमंत्र्यांची घेतली भेट :


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपुरात त्यांनी मनसेची कार्यकारिणी स्थापन केली. पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्रे दिल्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री दालनात भेट झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरेंचं स्वागत केलं. या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी बंद दाराआड काही वेळ चर्चाही केली.


📣 साई संस्थानचे भक्तांना मास्क वापरण्याचे आवाहन :


शिर्डीतील साई संस्थाननेही शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. कोरोना बीएफ-7 सब व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकारने भारतातील सर्व विमानतळांवर परदेशी प्रवाशांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साईबाबा संस्थानने आपल्या 40 विभागांची बैठक बोलवली आहे. यात कोरोना प्रतिबंध उपाय योजना तसेच घ्यायची काळजी यावर चर्चा करण्यात आली.


✈️ सानिया बनली देशातील पहिली मुस्लिम फायटर पायलट :


उत्तरप्रदेशमधल्या मिर्झापूर इथं राहणाऱ्या सानिया मिर्झा या तरुणीने देशातील पहिली मुस्लिम फायटर पायलट बनण्याचा मान पटकावला आहे. सानियाने एनडीए परीक्षेत 149 वा क्रमांकासह प्लाइंग विंगमध्ये दुसरं स्थान पटकावलं. एनडीएमध्ये 19 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. सानियाचे वडिल शाहिद अली मिर्झापूरमध्ये टिव्ही मॅकेनिक म्हणून काम करतात. 

Post a Comment

Previous Post Next Post