मुरुड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच अभयसिंह नाडे उपसरपंच आकाश कणसे यांचा पराभव....
पैसा हरला, मुरुड परिवर्तन पॅनल जिंकले
मुरुड प्रतिनिधी: - महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नाव उल्लेख असलेल्या लातूर जिल्ह्यातील मुरुड ग्रामपंचायतची निवडणूक पार पाडली या निवडणुकीत महविकास आघाडी प्रणित दिलीप दादा नाडे पॅनलचे उमेदवार माजी सरपंच अभयसिंह नाडे व माजी उपसरपंच आकाश कणसे हे ग्रामपंचायत सदस्यासाठी उभा होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. या पॅनल मध्ये सतरा उमेदवारापैकी एकच सदस्य निवडून आला असून मुरुड परिवर्तन पॅनला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
मुरुड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन पॅनलने निवडणूक लढली होती जसे की दिलीप दादा नाडे पॅनल, मुरुड परिवर्तन पॅनल तसेच मुरुड विकास पॅनल या तीन पॅनलने मुरुड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला होता. मुरुड परिवर्तन पॅनलचे प्रमुख अमर बापू नाडे यांचा प्रचार सभेतील भाषणानंतर व्यासपीठावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता त्यांच्या पत्नी अमृता अमर नाडे या सरपंच पदासाठी उभ्या होत्या, या निवडणुकीत सरपंच पदासाठी त्या विजयी झाले असून त्यांना तब्बल दहा हजार २५४ मते पडली आहे दिलीप दादा नाडे पॅनलचे सरपंच/सदस्य पदाचे उमेदवार, तसेच मुरुड विकास पॅनलचे सरपंच/सदस्य पदाचे उमेदवार यांचा पराभव झाला आहे.
या निवडणुकीत अमर बापू नाडे यांचे दुःखद निधन झाल्यामुळे दिलीप दादा नाडे पॅनलने सरपंच पदासाठी जाहीर पाठिंबा दिला होता पण सदस्य पदासाठी जाहीर पाठिंबा दिला नव्हता मतदानाच्या शेवटच्या दिवशी मुरुड मध्ये संध्याकाळी मतदारांना आपलेसे करण्यासाठी बरीच पैशाची उधळण झाली होती पण मतदाराने मुरुड परिवर्तन पॅनलच्या १७ पैकी १६ सदस्यांना व सरपंच पदाची उमेदवार यांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे. या विजयी उमेदवारांमध्ये वैशाली काळे, सूर्यकांत गाडे,हणमंत नागटिळक,लताबाई भोसले, फुलाबाई इटकर , अनंत कणसे, पल्लवी घोडके, श्रीकांत नाडे, शालू चव्हाण, कल्पना खराडे, श्रुती सवाई, मेघराज अंधारे ,अंजू शिंदे, वैभव सापसोड, प्रणिता पाटील ,सूरज सूर्यवंशी,महेश कणसे, विजयी झाले असून दिलीप दादा नाडे पॅनलच्या एकमेव उमेदवार कल्पना खराडे विजयी झाल्या आहेत.
या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी ग्रामपंचायत सदस्य अमर बापू नाडे यांनी प्रचार सभेत मुरुड परिवर्तन पॅनलच्या १७ सदस्य व सरपंच पदाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याची विनंती मुरुड ग्रामस्थांना केली होती व प्रचारात आघाडी घेतली होती, त्यांचे भाषण झाल्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले होते या घटनेमुळे मुरुड ग्रामस्थाचे मन हेलावून गेले होते मुरुड मतदारांनी कुठल्याही अमिषाला बळी न पडता मुरुड परिवर्तन पॅनलच्या बाजूने मतदान करून १६ सदस्य निवडून दिले असून मुरुड मध्ये सध्या एकच चर्चा दिसून येत आहे "गड आला पण सिंह गेला........."