औसा येथे दोन दिवसीय इस्तेमा संपन्न
औसा येथे दोन दिवसीय इस्तेमा संपन्न
औसा – येथे दिनांक ०५,०६, डिसेंबर २०२२ रोजी तुळजापूर – सोलापूर हायवे वानवडा – तुंगी दोन दिवसीय तबलीगीं इज्तेमा (शिबीराचे ) आयोजन करण्यात आले होते यावेळी तबलीगीं जमात लातूर जिल्हा अध्यक्ष (सदर) हाजी़ अन्सार साहेब यांच्या सह आयोजक , स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेऊन इज्तेमा यशस्वी होण्याकरिता प्रयत्न केले इस्लामिक अभ्यासक धर्मगुरू यांनी मानवी जिवनमान , जिवन यावर प्रवचन दिले दिल्ली मरक़ज येथील मौलाना फारुक खान यांनी ६५ विवाह लावले विवाहा किती महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले
प्रेषित हज़रत मुहम्मद (सल्ल.) यांच्या जिवनात साधारण राहणीमान यांचे महत्त्व व काळाची गरज़ किती महत्वाची आहे हे साध्य सोप्या शब्दात उदाहरण देऊन सांगितले प्रवचनाच्या माध्यमातून जनसमुदाय यांच्या समोर आजचे काही तरुण हा भरकटलेल्या अवस्थेत जिवन जगत आहे त्यांनी त्यांच्या जिवनशैली राहणीमान , शिक्षण , व्यवसाय , उद्देश , वाढते व्यसन हे युवकांच्या भविष्यात नुकसानीचे आहे यावर युवकांनी आपल्या राष्ट्रीय ऐक्य व ऐक्याची भावना एकात्मिक धोरण युवकांनी आत्मसात करावे आईबाबा यांनी दिलेले संस्कार याचे अवलोकन करावे व्यसन हे देश, समाज,आईबाबा, नातेवाईक , गाव , शहर, गल्ली ,घर , सह स्वतःच्या आरोग्याला नुकसानीचे आहे या करीता प्रेषित हज़रत मुहम्मद (सल्ल.) यांनी इस्लाम हा धर्म अगदी सोपा आहे व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या आपल्या राष्ट्राचा , देशाचा, कुटुंबाचा विचार करा वेळ गेलेली नाही आजही ” अल्लाह” ची क्षमा मागा ” अल्लाह ” दयावान ,दयाळू ,मायाळू आहे एकदा तर प्रयत्न करा नैराश्याच्या जिवन हे निकामी आहे नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करा , द्वेष , चाडी , यापासून दुर रहा विषेश युवक हे राष्ट्र व समाजाचे माँडल आहेत त्यांनी प्रेषित हज़रत मुहम्मद (सल्ल.) यांच्या जिवनावर चालण्याचा प्रयत्न करावा गुंडगिरी , गुंडशाही , जुगार , अड्डे याला इस्लाम मध्ये स्थान नाही इस्लाम हा मानवाच्या जिवनात व्यसना पासुन मुक्त करण्यासाठी प्रयत्नशिल आहे याकरिता १ वर्ष ४ महिने ४० दिवस ३ दिवस इब़लीगी जमात मध्ये “अल्लाह ” च्या मार्गावर निघा यात मानवाच्या कल्याणासाठी जिवन जगण्याची प्रेरणा मिळेल , वयोवृद्ध आजारी , यांच्या आरोग्यसाठी , कर्जदार , अविवाहित मुले मुली , यांच्या विवाहसाठी , विधवा यांच्या हि विवाह साठी , आईबाबा यांचे स्वप्न , या साठी प्रार्थना करण्यात आली तसेच मानवतावादी विचार , मानवाच्या कल्याणसाठी जिवनशैली मध्ये देखावा न करता घर , लग्न, राहमीमान , कपडे , स्वच्छ प्रतिमा , साधे जेवण ,स्वच्छ चारित्र्य , हिच मानवी जिवनाची प्रतिमा आहे हिच इस्लामची शिकवण आहे आचरण करा यावेळी स्वयंसेवक यांनी व्यासपीठ , पाणी , जेवण , स्नानगृह ,स्वच्छतागृह ,लाऊडस्पीकर मोटारसायकल , दुचाकी , चारचाकी , अँटो , जड वाहन यासाठी नियोजनाची व्यवस्था केली होती , प्रशासन , पोलीस प्रशासन , यांनी ही परिश्रम घेतले इज्तेमा स्थळी माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे आ.अभीमन्यु पवार यांनी हि इज्तेमा स्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या इज्तेमाचा दुआ च्या नंतर समारोपाच्या शेवटी परतीच्या वाटेवर स्वयंसेवक यांनीसाथी दुआ मे याद रखना हे वाक्य जड अंत:करणाने स्विकारुन भाविक भक्त यांनी निरोप घेतला
No comments