दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
🤓 RBIने वाढवला रेपो रेट :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग पाचव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 पॉइंटची वाढ करण्यात आल्याची घोषणा केली. त्यामुळे एकूण रेपो रेट 5.9 टक्क्यांवरून थेट 6.25 टक्क्यांवर गेला आहे. एमपीसीच्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेट वाढवण्याची घोषणा केली.
🗣️ हे सरकार नामर्दच.. संजय राऊतांचा शिंदे गट, भाजपवर हल्लाबोल
ज्या सरकारला महाराष्ट्राच्या सीमांचं संरक्षण करता येत नाही. त्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत आणि मुख्यमंत्री आहेत कुठे यासर्व वादामध्ये, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच, हो हे सरकार नामर्दच आहे, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचारही घेतला.
💁♂️ चंद्रशेखर बावनकुळेंची संजय राऊतांवर विखारी टीका :
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. सरकारमधील मंत्री बेळगावात गेले नाही म्हणजे सरकार षंढ ओह ही भाषा संजय राऊतांना शोभत नाही. मर्दानगी आणि सरकार चालविण्याची धमक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कशी आहे हे राऊतांना माहित आहे.
⚡ लोकसभेत गाजला सीमावादाचा मुद्दा, सुप्रिया सुळे आक्रमक :
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्राविरोधात काहीही वायफळ बोलत आहेत. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत आहेत, हे चालणार नाही, असा दम आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्नाटक सरकारला दिला. सीमावादावरून आज लोकसभेत सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झाल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद जाणूनबुजून पेटवला जात आहे.
🔎 भाजप 15 वर्षानंतर MCD सत्तेतून बाहेर :
'आप'ने दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) भाजपकडून हिसकावून घेतली आहे. 15 वर्षे भाजपची सत्ता होती. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, 250 जागांपैकी AAP ने 130 जागा जिंकल्या आहेत. 4 वर आघाडीवर आहे. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. पक्षाला 99 जागा मिळाल्या. 4 वर आघाडी कायम ठेवली. काँग्रेसने 7 जागा जिंकल्या आहेत. 3 वर आघाडी आहे. MCD मध्ये बहुमतासाठी 126 जागांची आवश्यकता होती.
No comments