दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा
📝 *लवकरच कृषी अभ्यासक्रमात नैसर्गिक शेतीचा समावेश होणार*
नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. नैसर्गिक पद्धतीनं शेती केल्यास खर्च कमी होतो, उत्पादनाला अधिक चांगला भाव मिळत असल्याचं वक्तव्य केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केलंय. यापुढं नैसर्गिक शेती हा कृषी शिक्षणाचा भाग असेल. लवकरच कृषी शिक्षण अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती पद्धतींचा समावेश करण्याच्या दिशेनं सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे तोमर यांनी सांगितलंय. ग्वाल्हेर येथे आयोजित करण्यात आलेल्या नैसर्गिक शेतीविषयक कार्यशाळेत तोमर बोलत होते.
😎 *आता औषधांच्या पाकिटावर क्यूआर कोड अनिवार्य होणार*
केंद्र सरकारकडून आता पुढील वर्षांपासून औषधांवर बारकोड अथवा क्यूआर कोड लावणं अनिवार्य होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याच्या हालचाली सुरू झाल्यात. देशात विक्री होणाऱ्या औषधांच्या पाकिटांवर बारकोड अनिवार्य करण्यासाठी केंद्र सरकारने मागील वर्षी ड्रग्ज अॅण्ड कॉस्मेटीक रुल्स 1945 कायद्यात दुरुस्ती करत त्यात अनुसूची एच2 जोडली. या निर्णयामुळे उत्पादन आणि वितरण साखळीच्या माध्यमातून औषधांची सत्यता पडताळणी शक्य होणार आहे. यातून बनावट औषधांना आळा बसणार असल्याचं म्हटलं जातंय.
🗣️ *सुषमा अंधारेंचा नितीन गडकरींवर आरोप*
'नागपूर आणि बीड यांचा संघर्ष पहिल्यापासून चालत आलाय. केंद्रीय मंत्री गडकरी नितीन गडकरी हे गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये अडकवत होते, असा गौप्यस्पोट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जाहीर सभेत केलाय. आता देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांना अडकवत असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केलीय. सुषमा अंधारे यांची यात्रा महाप्रबोधन यात्रा भंडारा जिल्ह्यात पोहोचलीय. भंडारा जिल्ह्यातील सभेत अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
😇 *महिलांविषयीचे वादग्रस्त वक्तव्य अब्दुल सत्तारांना भोवणार?*
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. सत्तारांच्या कृतीमुळे राज्यभरात राष्ट्रवादीचे वतीने आंदोलन देखील झाली. यासंदर्भात सर्वपक्षीय महिला आमदार व खासदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन दिले होते. आता याच प्रकरणात राज्यपालांनी सादर पत्र पुढील कारवाईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविले आहे. त्यामुळे हे प्रकरण सत्तार यांना भोवण्याची शक्यता आहे.
🏏 *टीम इंडियाचे बांग्लादेशसमोर 187 धावांचे आव्हान*
टीम इंडियाचा आज बांग्लादेश विरुद्ध वनडे सीरीजमधला पहिला सामना सुरू आहे. ढाकामध्ये सुरू असलेल्या या सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान भारताचा डाव कोसल्याने निर्धारित 50 षटके देखील संघ खेळू शकला नाही. 41.2 षटकात भारताला अवघ्या 186 धावाच करता आल्या. भारताकडून के एल राहूल एकटा लढला. त्याने झुंजार 73 धावांची खेळी केली. बांग्लादेशकडून शकीब अल हसनने 5 बळी घेतले
.jpeg)
No comments