📣 विधानसभेत सरकारची मोठी घोषणा! :
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या साडे चार हजार जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गिरीश महाजन यांनी केली. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार आहे.
⚡ ...तर भारत जोडो यात्रा थांबवावी :
चीनच नव्हे तर जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्ये देखील कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतानं सावध होत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधींना पत्र लिहित भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन केले आहे.
💁♂️ मार्गदर्शक सूचनांचं पालन करा : अदार पूनावाला :
चीनमधील कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ अदार पूनावाला यांनी भाष्य करत भारतीयांना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. भारताची उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्डमुळे घाबरण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं. सोबतच मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन देखील केलं. याबाबत पूनावाला यांनी ट्वीट केलं आहे.
🗣️ सीमाप्रश्नी गृहमंत्री अमित शाहांनी नेमकं काय केलं? :
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जाणूनबुजून आग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. बोम्मई रोज अपमान करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी केली म्हणजे नेमकं काय केलं? परिस्थिती जैसे थे असल्याचे राऊत म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.
🔥 मुंबईकरांचं वीज, पाणी महागलं :
मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. वीज आणि पाण्यासाठी मुंबईकरांचा खिसा आता जास्त रिकामा होणार आहे. मुंबईकरांच्या वीजबिलात आणि पाणी बिलात वाढ होणार आहे. कोरोना काळात दोन वर्षांपासून थांबलेल्या पाणीपट्टीमध्ये आता वाढ होणार आहे. 2022 आणि 2023 साठी 7.12 टक्के पाणीपट्टी वाढ करण्यास पालिका आयुक्त प्रशासक इक्बाल चहल यांनी मंजुरी दिली आहे. जूनपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे.