नेक दवाखाने वैद्यकीय कचरा बेजबाबदारपणे फेकत आहेत

 नेक दवाखाने वैद्यकीय कचरा बेजबाबदारपणे फेकत आहेत



 नांदेड (मुनवर खान) दि.21 शहरातील अनेक लहान मोठी दवाखाने दैनंदिन निघणारा वैद्यकीय कचरा बेजबाबदार पणे फेकून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत.
 नांदेड शहराचा विकास ज्या झपाटाने झाला त्यापेक्षा अधिक वेगाने नांदेडमध्ये नवनवीन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहिले आज घडीला महाराष्ट्रातील सर्वात जास्त दवाखाने असणारा जिल्हा म्हणून नांदेड ओळखल्या जातो या दवाखान्यात द्वारे रुग्णांची तपासणी,रोग निदान व विलाज झाल्यानंतर जो वैद्यकीय कचरा निघतो त्याची विल्हेवाट लावण्याची विशिष्ट पद्धती या दवाखान्यांना निश्चित करून दिलेली आहे.  तरीपण अनेक दवाखाने या वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावत नाहीत.  असेच दिसून येत आहे नियमांचा भंग करून सर्रासपणे वैद्यकीय कचरा रस्त्यावर बेजबाबदारपणे फेकला जात आहे. हे प्रकार वाजेगाव परिसर व गोदावरी नदीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घडताना दिसून येत आहेत यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक साठी  येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास देखील होत आहे तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते,याकडे आरोग्य विभाग व महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन कङक कारवाई केली पाहिजे. तरच वैद्यकीय कचऱ्याचे हे दवाखाने शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावतील अन्यथा त्याचा दुष्परिणाम म्हणून अनेक नागरिकांना आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो याची नोंद संबंधित विभागाने घेतली पाहिजे.

Post a Comment

Previous Post Next Post