दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटीतर्फे चौकशी होणार :
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. दिशा सालियनच्या मृत्यूवेळी तिच्या घरी कोणता नेता होता याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीय. नितेश राणे आणि भरत गोगावले यांनी ही मागणी केलीय. दरम्यान, दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर दिशा सालियन प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे.
😎 फोन टॅपिंगच्या मुद्यावरून विधानसभेत गदारोळ :
फोन टॅपिंगच्या मुद्यावर विरोधकांनी आज विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या चौकशी प्रकरणात हायकोर्टात राज्य सरकारने क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर विरोधी पक्षांनी सभागृहात चर्चेची मागणी केली. मात्र, नियमांचा दाखला देत विधानसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. विधानसभा अध्यक्षांकडून सरकारचा बचाव होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.
🗣️ राहुल शेवाळेंनी केलेले आरोप पोरकटपणाचे... :
हे सरकार औटघटकेच असून, सरकार भ्रष्टाचाराच्या ओझ्यानंच पडणार असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ज्यांच्यावर बलात्कारापासून विनयभंगापर्यंतचे आरोप आहेत, अशा व्यक्तीने आदित्य ठाकरेंवर आरोप करणं म्हणजे फुटीर लोक किती खालच्या स्तरावर गेलेत हे दिसून येत आहे. खासदार राहुल शेवाळेंनी केलेले आरोप पोरकटपणाचे आणि बिनबुडाचे असल्याचे संजय राऊत म्हणाले.
😷 गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क; केंद्राच्या राज्यांना सूचना :
ज्यात पुन्हा एकदा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे तसेच लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिला आहे. कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याबरोबरच वर्धक मात्रेसह संपूर्ण लसीकरणासाठी प्रयत्नशील राहावे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सांगितलं.
🎬 'RRR', 'छेल्लो शो'ला ऑस्करचे नामांकन :
ऑस्करच्या नामांकनात दोन भारतीय चित्रपट निवडले गेले आहेत. एस एस राजामौली यांच्या 'आरआरआर'सह 'छेल्लो शो' या गुजराती चित्रपटाला ऑस्करमध्ये नामांकन मिळाले आहे. बुधवारी 10 ऑस्कर श्रेणींसाठी शॉर्टलिस्ट जाहीर करण्यात आली. यामध्ये डॉक्युमेंट्री आणि इंटरनॅशनल फीचर, डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट आणि ओरिजनल स्कोर यांचा समावेश आहे.