चुकीच्या लोकांमुळे विविध जाती धर्मांमध्ये भेद श्रद्धानंद महाराजांचे भागवत कथेत खडे बोल



 चुकीच्या लोकांमुळे विविध जाती धर्मांमध्ये भेद 

श्रद्धानंद महाराजांचे भागवत कथेत खडे बोल 


लातूर ; -तथाकथित धार्मिक नेते , धर्मगुरू व धर्म प्रसारक यांच्यामुळे हिंदू - मुस्लिम धर्मांमध्ये फूट पडत चालली असून विविध जाती -धर्मांमध्ये भेद निर्माण होत आहेत .अखंड भारताच्या स्वप्नाला तिलांजली देणारे हे आहे . यामुळे देश खिळखिळा बनत चालला आहे  , अशी खंत प.पू.  श्रद्धानंदजी सागर महाराज ( बाबा ) यांनी व्यक्त केली .     श्री राधाकृष्ण सत्संग समितीच्या वतीने लातूर येथील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात 25 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये दुपारी एक ते चार या वेळात प.पू. श्रद्धानंद महाराजांच्या अमोघ वाणीचा श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ आयोजित करण्यात आला आहे . बाबा दुसऱ्या दिवशीच्या कथेमध्ये बोलत होते. त्यांची कथा श्रवण करण्यासाठी भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

       प. पू. श्रद्धानंदजी सागर महाराजांनी आजच्या कथेत हिंदू धर्म  , संस्कृती , अनिष्ट प्रथा , चुकीचे पांयंडेक्ष ,पाखंडीपणा , साधुसंत ,  महंत , कीर्तनकार कथाकार यांच्या पाखंडीपणावर जोरदार प्रहार चढवला . यात वेळीच बदल झाला नाही तर भविष्यात आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल , त्यासाठी सर्वांनीच एकत्र येऊन आत्मचिंतन करावे आणि आपल्या वागण्या बोलण्यात बदल केले पाहिजे ; अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

   महिलांवरील वाढते अन्याय व अत्याचार आणि हल्ले यांच्यावर देखील बाबांनी आपल्या कथेत समाज व्यवस्थेवर आसूड ओढले. ' नारी रतन की खान है '  ' …  नारीकि निंदा मत करो '  असे कळकळीचे आवाहन केले.  ते याबाबत अधिक भाष्य करताना म्हणाले की ,  स्त्री शक्तीचा सन्मान करणारा हा देश आहे. नारी इस देश की भाग्यविधाता है . ज्या देशात स्त्रीशक्तीचा सन्मान होत नाही तो देश रसातळाला जायला वेळ लागत नाही. हल्ली स्त्रियांवर होणारे हल्ले व अन्याय अत्याचार ही चिंतनीय बाब आहे . हे थांबवण्यासाठी समाज धुरिणांनी एकत्र येऊन उपायोजना केली  पाहिजे .

    भगवान बनना आसान है लेकिन इंसान बनवा कठीण 

भगवान बनना आसान है लेकिन अच्छा इंसान बनना बहुत कठीण है असे सांगत श्रद्धानंद महाराज पुढे बोलताना म्हणाले की ;  आजकाल प्रत्येक जण मी व माझे कुटुंब एवढाच मर्यादित विचार करतो. त्यांना समाज व देश याचे काहीही देणे घेणे नसते .व्यसनाधीनता  , स्वार्थ लोलूपपणा व कुपमंडूप वृत्ती यामुळे सर्वत्र स्वार्थ बोकाळत चाललेला आहे. चांगली व सदाचारी माणसे आज अभावानेच सापडतात. एक वेळ तुम्ही जप , पूजा पाठ , उपास तापास ,कर्मकांड नाही केले तरी चालतील ;  त्यापेक्षा चांगले वागा व चांगले जगा… !  तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या.   धर्माच्या नावावर स्वतःची दुकानदारी चालवणाऱ्या आणि स्वतःला धर्मगुरू,  धर्म प्रसारक म्हणून घेणाऱ्यावर देखील बाबांनी तिखट शब्दात प्रहार केला.धर्माच्या नावावर जाती- धर्मात भेद निर्माण करणाऱ्या आणि स्वतःची दुकानदारी चालवणाऱ्या बाजार बुणग्यांना  समाजाने बाजूला सारले पाहिजे . चुकीच्या लोकांच्या लेचेपेचे विचारामुळे धर्म संकटात सापडणार आहे , अशा पाखंडी , कूपमंडुप  लोकांना समाजाने खड्यासारखे बाजूला सारायला हवे,  असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post