Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    मुहम्मद मुस्लिम कबीर यांना सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर



     मुहम्मद मुस्लिम कबीर यांना सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर 


    लातूर - येथील उर्दू पत्रकारिता क्षेत्रात भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे मुहम्मद मुस्लिम कबीर यांना सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या

    आदर्श पत्रकार २०२३ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

           सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात मुहम्मद मुस्लिम कबीर यांच्यासह अनेक पत्रकारांचा समावेश असून यावेळी माजी जिल्हा माहिती अधिकारी यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

             सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी २०२३ ला आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान कार्यक्रम व माजी जिल्हा माहिती अधिकारी तसेच उर्दू पत्रकारितेला दोनशेवर्ष पूर्ण झाल्याबद्दल उर्दू वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींचा सन्मान केला जाणार आहे. अशी माहिती सचिव प्रा.पी.पी. कुलकर्णी यांनी दिली. पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दि. ६ जानेवारी २०२३ सकाळी ११:०० वाजता पत्रकार भवन, विजयपुर रोड, येथे होणारआहे. पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या शुभ हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक मठपती असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर या उपस्थित राहणार आहेत

                  तसेच पत्रकार दिनानिमित्ताने उर्दू पत्रकारितेला दोनशे वर्ष  झाल्याने ज्येष्ठ पत्रकार, लेखक मुहम्मद मुस्लीम कबीर यांना 'उर्दू पत्रकारितेचे वारसदार' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

        तरी या कार्यक्रमास सर्वानी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन सचिव पी. पी. कुलकर्णी, सहसचिव अबुबकर नल्लामंदू यांनी केले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad