महिला आर्थिक विकास महामंडळ लातूर मार्गदर्शित जयहिंद लोकसंचलीत साधन केंद्र लातूर पूर्व यांचा कार्यक्षेत्रातील भूसनी, येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जयंतीनिमित्त सकस आहार रेसिपी स्पर्धा,तिरंगा थाळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले भूसनी या ठिकाणी
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. कोमल भारती व प्रमुख पाहुणे बाभळगाव ग्रामीण रुग्णालय चा डॉक्टर साबळे मॅडम यांनी भूषविले
डॉक्टर मॅडम यांनी महिलेचे आरोग्य कसे सुधारले पाहिजे,सकस आहार विषयी प्रत्येक ऋतु मध्ये कोणकोणाता आहार आपण घेतला पाहिजे यावर खूप सुंदर व महत्त्वपूर्ण माहिती सांगितली तसेच CMRC अध्यक्ष कोमल भारती यांनी परसबाग लागवड यातून उत्पादन होणार भाजीपाला याबद्दल खूप सुंदर माहिती दिली व सर्वांचे कौतुक केले.पाटील मॅडम यांनी तिरंगा थाळी यांवर मार्गदर्शन केले.*
गावातील सर्व महिला अतिशय उत्सुकतेने या कार्यक्रमात सहभागी झाल्या काही महिलांनी तिरंगा थाळी स्पर्धेत सहभागी झाल्या. या स्पर्धेतून पहिला, दुसरा क्रमांक काढला या बरोबरच कार्यक्षेत्रातील सर्व आशा कार्यकर्ताया पण उपस्थिती होत्या तसेच या कार्यक्रमाला CMRC चा ,CRP अंजना भारती यांनी सूत्रसंचालन केले सहयोगीनि एन.आर. कांबळे मॅडम यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment