"लव्हचा अर्थ मला कळतो जिहादचा..."; हिंदूंच्या मोर्चावर सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका
पुणे : मुंबईतील दादर शिवाजी पार्कवर हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन आज करण्यात आले आहे. यात लाखो हिंदूंनी सहभागी घेतला आहे. राज्यासह संपूर्ण देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा या प्रमुख मागणीसाठी हिंदू धर्म रक्षा विराट मोर्चा दादर शिवाजी पार्क ते कामगार स्टेडियमपर्यंत जाणार आहे.
भाजपच्या स्थानिक नेत्यांनी देखील या मोर्चात सहभाग घेतला आहे. तसेच आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाचा देखील मोर्चा काढण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "एकतर मोर्चा म्हणजे सरकार विरोधात आहेत. हे असंवेदनशील ईडी सरकार आहे. कोणी ऐकून घेत नाही म्हणून लोकांना रस्त्यावर उतरायला लागतं आहे. लिंगायत समाजाचे प्रश्न मी सातत्याने संसदेत मांडत आहे. समजाचे प्रश्न समजून घ्यायला हवे. त्यात मार्ग काढायला हवा, ही प्रत्येक सरकारची नैतिक जबाबदारी असते."
Tags
ताज्या बातम्या