अभ्यासिका बेकायदा बांध कामास न्यालयाकडून स्थगिती



 अभ्यासिका  बेकायदा बांध कामास न्यालयाकडून स्थगिती

मालेगाव : शहरातील मोसम पुलाजवळील जुन्या म्यू.मराठी शाळेच्या जागेवर सध्या सुरू असलेले अभ्यासीकेचे बांधकाम दाव्याच्या अंतिम निकला पर्यंत थांबवण्यात यावे असा तूर्तास तूर्त मनाई हुकूम महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी अभियंता सार्व.बांधकाम यांचे विरोधात नुकताच येथील दिवाणी न्यायाधीश ( व.स्तर ) यांनी दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,मालेगाव येथील माजी नगरसेवक गुलाब तानाजी पगारे यांनी मालेगाव महानगर पालिका शहर अभियंता नगर रचनाकार महापालिका महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकारी, सार्व.बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी अभियंता या सर्वांच्या विरोधात जुन्या म्यु.मराठी शाळेत अभ्यासिकेचे सुरू असलेले बांधकाम बंद करण्यात यावे व तसा मनाई हुकूम मिळावा म्हणून येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केलेला होता.त्या दाव्यात निकाल लागेपर्यंत तूर्तास तूर्त मनाई हुकूम मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता सदर अर्जाचा गुणवत्तेवर निकाल लागून महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी अभियंता यांनी संगमेश्वर वॉर्डातील फायनल प्लॉट क्रमांक ७४ मधील मराठी शाळा या दावा मिळकतीत सुरू असलेले अभ्यासिकेचे बांधकाम दाव्याच्या अंतिम निकालात पर्यंत थांबवण्याचा आदेश नुकताच ७ व सह दिवाणी न्यायाधीश ( व. स्तर ) यांनी दिलेला आहे.खरे पाहता दावा मिळकतीच्या परिसरात म.ज्योतिराव फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी महापालिकेचे दि.२३/९/२१ चे सभेत विषय क्रमांक २४१ अन्वये मंजुरी देण्यात आली होती असे असताना या जागेवर बेकायदेशीर अभ्यासिका बांधकामाची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध करून अतिशय घाई गर्दीने, व बेकायदेशीर दावा मिळकत पडण्याचे काम सुरू करण्यात आले.मराठी शाळेचे नूतनीकरण व सुशोभीकरण इ.साठी रू.५०,००००० व अभ्यासिका तयार करण्यासाठी रू.२५,००००० चे टेंडर काढून अती घाई गर्दीत काम सुरू केल्याचे वादी चे वकील प्रदीप मर्चंट यांनी युक्तिवाद करताना मे.नायालयाच्या लक्षात आणून दिले इतकेच नाही तर महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी न घेता  तसेच सदर बांधकाम  करताना परवानगी न घेता स्ट्रक्चरल ऑडिट न करता शिक्षण मंडळाची परवानगी नसताना सदर बांधकाम रात्रंदिवस सुरू असल्याचे वादी यांच्या वकिलांनी मे.कोर्टाचे निदर्शनास आणून दिल्याने मे.कोर्टाने वरील सर्व युक्तिवाद लक्षात घेऊन मालेगाव शहरातील मोसम पुलाजवळील जुन्या.मराठी शाळेच्या जागेत सुरू असलेले अभ्यासिकेचे बांधकाम दाव्याच्या अंतिम निकाल लागेपर्यंत थांबवण्यात यावे असा तूर्तास तूर्त मनाई हुकूम महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी अभियंता यांचे विरुद्ध दिला आहे.वादी तर्फे adv. प्रदीप मर्चंट,निमिष मर्चंट यांनी काम पाहिले.या गाजलेल्या निकालाकडे मालेगाव शहर वासियांचे लक्ष लागले होते..

यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले स्मारक कृतिसमितीचे अध्यक्ष गुलाब पगारे,कैलास तीसगे,नितीन पोफळे,निखिल पवार,देवा माळी, प्रकाश वाघ,विष्णू पवार समता परिषदेचे धर्मा भामरे,नरेंद्र सोनवणे,नितीन शेलार,विनायक माळी,ज्ञानेश्वर बागुल,संजय काळे,भारत पाटील,विलास गवळी,जितेंद्र देसले,नाना अहिरे,विजय गवळी,काचरू गवळी संतोष गवळी,सुनील गवळी,भीमा गवळी,सचिन पगारे मनोज गवळी इ.नी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post