दिवसभरातील ताज्या घडामोडी




🥶 महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट :


पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, आज आणि उद्या मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीमध्ये चढउतार सुरू आहे. हा हवामान बदलाचा फटका असल्याचे तज्ज्ञ म्हणत आहेत.


🗣️ उद्धव ठाकरेंचा शिंदे सेनेवर हल्लाबोल :


निष्ठेच्या पांघरुणाखाली शिरलेले लांडगे विकले गेले. त्यांच्यामुळे महाराष्ट्राची देशभर बदनामी झाली. त्यामुळेच पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा काश्मीरमध्येही घुमल्या, अशी घणाघाती टीका गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी केली. ते ठाण्यात बोलत होते. ठाणामध्ये लवकरच जाहीर सभा घेणार आहे. या सभेत साऱ्यांचा काय तो समाचार घेईन, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.


👀 'पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी' :


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेचा शपथविधीमागे पवारांची खेळी असू शकते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


💪 राजपथावर साडेतीन शक्तिपीठांचं दर्शन :


दिल्लीतील राजपथावर विविध राज्यांच्या वतीने चित्ररथाचे सादरीकरण करण्यात आले. यात महाराष्ट्राच्या चित्ररथातून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. महाराष्ट्राच्या चित्ररथावर साडेतीन शक्तिपीठांचा देखावा करण्यात आला. कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणीच्या देवींचे दर्शन या चित्ररथातून दिसून आले आहे. चित्ररथाच्या मध्यभागी पोतराज दिसून आला.


😎 सेन्सॉरच्या आदेशावर 'पठाण'मध्ये बदल :


शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी वाढता वाद बघता सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने चित्रपटातील काही वादग्रस्त आणि संवेदनशील गोष्टींमध्ये बदल करण्याची मागणी केली होती, जी निर्मात्यांनी पूर्ण केली आहे. पीएमओ, मिसेस भारतमाता असे सुमारे दोन डझन शब्द चित्रपटातून काढून टाकण्यात आले असून गाण्यातही बदल करण्यात आला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post