Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    ...म्हणून महाराष्ट्रातील तरुणांची लग्न होत नाहीयेत, शरद पवारांचं मर्मावर बोट

     



    ...म्हणून महाराष्ट्रातील तरुणांची लग्न होत नाहीयेत, शरद पवारांचं मर्मावर बोट


    मुंबई : महाराष्ट्रातून उद्योग बाहेरच्या राज्यात न्यायचे आणि नवीन उद्योग राज्यात येण्यास सवलती द्यायच्या नाहीत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. या कारणानेच महाराष्ट्रात तरुण मुलांची लग्नं होत नाहीत, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षशरद पवार यांनी व्यक्त केले. बुधवारी पुण्यात आयोजित एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.


    राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात जनजागर यात्रा सुरु करण्यात आली आहे. या यात्रेचं उद्घाटन झाल्यानंतर शरद पवार बोलत होते.
    केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार आहे. या दोन्ही सरकारची नीती जनतेला महागाईत लोटण्याची आहे. सत्तेत येण्यासाठी मोठी आश्‍वासने दिली. मात्र ती पाळता येत नसल्याने आणि जनतेचं या विषयावरील लक्ष हटण्यासाठी जाणीवपूर्वक जातीपाती आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.राज्य सरकारमधील एका मंत्र्याने राज्यातील काही महापुरुषांनी भीक मागून शाळा सुरु केल्याचे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रातील नेते सोडा, सर्वसामान्य माणूसही कधी भीक मागत नाही. महाराष्ट्रीय माणूस हा श्रम करणारा आणि घामातून कमावणारा माणूस आहे, असा टोलाही शरद पवार यांनी भाजपला लगावला.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा. फौजिया खान, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे पुणे शहराध्‍यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad