Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची युती का तुटली?, असदुद्दीन औवसी यांनी नाशिकमध्ये सांगितलं…

     

    प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची युती का तुटली?, असदुद्दीन औवसी यांनी नाशिकमध्ये सांगितलं...

    प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची युती का तुटली?, असदुद्दीन औवसी यांनी नाशिकमध्ये सांगितलं…


    नाशिक : उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असं म्हणत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने (MIM) युती केली. पण काही दिवसांआधी ही युती तुटली. पण ही युती नेमकी का तुटली याबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार चर्चा होत असते. त्यावर आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी भाष्य केलंय.युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांचा होता. त्यांच्या या निर्णयाचा मी कालही आदर करत होतो. आजही करतो अन् पुढेही करत राहील. वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. पण आंबेडकर या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर मी काय बोलू शकतो? आमच्यासोबतची युती का तुटली ती मोठी गोष्ट आहे. ती मी आता कसं सांगू? योग्य वेळी त्यावर बोलेल, असं असदुद्दीन ओवैसी म्हणालेत.

    लव्ह जिहाद विरोधी कायद्यावरही ओवैसी बोललेत. भारताच्या संविधानानूसार आपल्या आवडीनुसार लग्न करू शकतात. जिथे जिथे भाजप सत्तेत आहे तिथे तिथे हा बेकायदेशीर कायदा बनवण्यात आला आहे, असं म्हणत औवैसी यांनी भाजपवर टीका केली आहे.लव्ह जिहाद म्हणतात पण भाजपमध्ये असे किती लोकं आहेत की त्यांनी अशी लग्न केली आहेत. कोणी प्रेम करतंय तर तुम्हाला त्रास काय ? प्रत्येक प्रश्नाला जातीयवादी नजरेतून बघणं योग्य नाही. लव्ह जिहाद कायदा तुम्ही सिद्ध कसा करणार ? धर्मपरिवर्तनबाबत जुना कायदा आहे. ज्यांना जे आवडतंय ते करूद्या. आपल्याकडे बेरोजगारी, महागाई आणि इतर खूप मुद्दे आहेत, त्यावर बोला, असं औवैसी म्हणालेत.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad