कोरोनाची नवी लक्षणं कोणती?; या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका!

 

Covid Symptoms : कोरोनाची नवी लक्षणं कोणती?; या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका!


गेली दोन वर्ष कोरोना काळात आपण एवढा सहन केलाय की, घराघरातील लहान बालकांनाही कोव्हिड-19 कशाने होतो, त्याची लक्षणे काय हे पाठ झाले आहे. त्यामुळे थोडी जरी घशात खवखव किंवा ताप आला तरी लगेच त्याकडे दुर्लक्ष न करता उपचार केले जातात. पण, आता कोरोनाने त्याची लक्षणेच बदलली आहेत.

होय, गेली दोन वर्ष एकाच प्रकारच्या आजाराने कोरोनाची लागन व्हायची. कोरोना आणि ओमायक्रॉन या आजारांनी अनेक लोकांचे जीव घेतले. पण, आता पुन्हा एकदा कोरोनाने नांगी वर काढली आहे. पण, सध्या कोरोना पेशंटना होणाऱ्या या आजाराची लक्षणे बदलली आहेत. आता सर्दी खोकला नाही तर एका शरीराच्या एका अवयवावर तिव्र वेदना होतात.तूमच्या स्नायूंचे दुखणे हे कोविडचे नवे लक्षण आहे. झो कोविड स्टडीनुसार, कोव्हिड-19 चा थेट परिणाम तूमच्या खांद्यावर आणि पायांवर होतो. कोव्हिड-19 ची लागण झालेल्या व्यक्तीच्या खांद्यांमध्ये तीव्र वेदना होऊ शकतात. दैनंदिन कामात व्यस्त असताना लोक त्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू शकतात. त्यामुळे कोविडसारख्या गंभीर आजाराचा धोका अधिक वाढू शकतो.

दुखणे सामान्य नाही हे कसे ओळखावे

खांदे आणि पाय दुखण्याची समस्या सलग 2 ते 3 दिवस असेल तर ते सामान्य असते. पण, जर तुम्हाला ही समस्या त्यापेक्षा जास्त काळ असेल तर तुम्हाला कोव्हिड-19 ची चाचणी करणे आवश्यक आहे. याशिवाय शरीरावरील इतर स्नायूंच्या दुखण्याकडेही दुर्लक्ष करू नका.

Post a Comment

0 Comments