लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत नागरीकांनी सुचना द्याव्यात मनपाचे आवाहन - latursaptrangnews

Breaking

Sunday, June 29, 2025

लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत नागरीकांनी सुचना द्याव्यात मनपाचे आवाहन

 





लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत नागरीकांनी सुचना द्याव्यात मनपाचे आवाहन  

 

लातूर /प्रतिनिधी : लोकसंख्या व वाहनांची संख्या‍ वाढत असल्यामुळे लातूर शहरामधील मुख्य रस्यावर ट्राफीक वाढत असून रहदारीची समस्या वाढत आहे. शहरातील वाहतूकीच्या समस्येवर मार्ग काढण्याच्या  दृष्टीने मनपा आयुक्त. मानसी मॅडम (भा.प्र.से) यांनी आज दि. २६.०६.२०२५ रोजी अतिरिक्त‍ आयुक्त‍उपायुक्त व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेवून लातूर शहरातील वाढत्या ट्राफिक व उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच सदरील उपाययोजनांतर्गत नागरीकांच्या सूचनाकल्पना विचारात घेण्याचे निर्देश आयुक्त मानसी मॅडम यांनी प्रशासनास दिले आहेत. तरी याव्दारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते कीशहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर आपले सूचना https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeDz1uCNYdEtewApgFsNu75lPL7mhih93uCrP5Mr7DV7RnCug/viewform?usp=sharing&ouid=117954850046356849811 वर व खालील दिलेल्या QR Code Scan करुन किंवा अभिप्राय हे लेखी स्वरुपात दि. २७.०६.२०२५ ते दि. ०४.०७.२०२५ पर्यंत मनपाकडे दयावेत. जेणे करुन पूढील नियोजनात आपल्या बहूमूल्य सूचना शहराच्या विकासात समाविष्ठ करुन घेता येतील. 

No comments:

Post a Comment