रुग्णवाहिकेचा संप जोमात मात्र रुग्ण कोमात...!
( महाराष्ट्र राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालक न्याय
हक्कासाठी १ जुलै २०२५ पासून उतरणार रस्त्यावर..! )
युवा भिम सेना संघटना, संस्थापक अध्यक्ष पंकज काटे यांनी 108 रुग्णवाहिकेच्या संघटनेला पाठिंबा देण्यात आले आहे.
मुरुड (श्रीकांत टिळक ):- लातूर येथील 108 रुग्णवाहिकाचे कर्मचारी संपावर गेल्यावर सामान्य नागरिकावर येणार आर्थिक व मानसिक, महाप्रलय या संपाच्या काळात येण्याची शक्यता आहे. तसेच 108 रुग्णवाहिका सेवा पूर्णपणे बंद झाली तर सर्वसामान्य माणसासाठी अवघड परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नकारता येत नाही . याबाबत शासनाने त्यावर निर्णय घेणे अतिशय योग्य राहील अन्यथा सामान्य जनतेला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रुग्णवाहिकेचा संप जोमात मात्र रुग्ण कोमात.! अशी भन्नाट चर्चा नागरिकात होताना दिसत आहे.
राज्यातील १०८ रुग्णवाहीका चालक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्वपूर्ण सेवा देत आहेत यांच्या समस्यांबाबत १
मे २०२५ रोजी आझाद मैदान मध्ये आंदोलन करून शासनाला निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती परंतु चर्चेच्या वेळी आपण १०८ वाहनचालकांच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन सरकार ने दिले होते. त्याप्रमाणे सेवा पुरवठादारांशी पत्र व्यवहारही केला परंतु सेवा पुरवठा दराकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही असे दिसून येत आहे. १०८ रुणवाहीका चालकांच्या संघटनेनेही सेवा पुरवठारांना निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली होती. १५
जून पर्यंत चर्चा करून मागण्यांचे पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही सेवा पुरवठादार यांना देण्यात आलेला होता. परंतु तरीही १०८ रुग्णवाहीका चालकांच्या मागण्याबाबत कुठली हालचाल आपले स्तरावरून किंवा सेवा पुरवठादार यांचेकडून
होत नाही. त्यामुळे १०८ ॲम्बुलन्स वाहन चालका मध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अल्प वेतनावर त्यांना काम करावे लागते, चालकाची व अंबुलन्सांची अवस्था अत्यंत वाईट आहे,अंबुलन्स ला आग लागून रुग्ण व वाहनचालकांचा जिवाला धोका निर्माण होईल ? अशा घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत,वाहन चालकाकडून ज्यादा काम करून घेतले जाते परंतु त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नाही. परंतु आता महाराष्ट्र शासन आणि सेवा पुरवठादार दोघेही या मागण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्यामुळे काम बंद आदोलन पुकारण्यात आला आहे.याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय त्यांच्यासमोर राहिलेला नाही. विविध मागण्याबाबत तातडीने आरोग्य विभागाने ,महाराष्ट्र शासनाने यावर योग्य निर्णय घ्यावा . अन्यथा तसेच १ जुलै २०२५ रोजी १०८ रुग्णवाहीका चालकांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला राज्यभरातील सर्व सामाजिक संघटना, कामगार संघटना व शेतकरी संघटना पाठिंबा देत आहेत, वेळ प्रसंगी रस्त्यावरही उतरणार आहेत. कोरोनासारख्या
काळात आपल्या परिवारापासून वंचित राहून जीव धोक्यात घालत पुर्ण प्राण प्रतिष्ठापणाला लावून रुग्ण सेवेची अंमलबजावणी करणाऱ्या रुग्णवाहीका चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याची अत्यंत गरज आहे. अनेक वेळा 108 ला कॉन्टॅक्ट साधण्याचा प्रयत्न करूनही फोन लागत नसेल तरीही आपल्या कर्तव्यास पालन करणारे अनेक कर्तव्यदक्ष चालक आहेत. तसेच अनेक वेळी 104 ची सेवा ही अपुरी पडत असल्याचे दिसून येत आहे ?,अशी भन्नाट चर्चा नागरिकात होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment