महापालिके चा व्यवसाय परवान्यासाठी व्यापाऱ्यांना नोटिसा
लातूर : महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी शहरातील विविध व्यापाऱ्यांना व्यवसायाचा परवाना काढून घेण्याच्या सूचना महापालिकेकडून करण्यात येत आहेत. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानमालकांना क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत नोटिसा बजावण्यात येत असल्याने नव्या वसुलीवरून महापालिका व व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा वादंग होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. व्यवसायानुसार परवाना शुल्क आकारण्यात आले असून, नोटिसीत शुल्क पाहून अनेकजण चकित झाले आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका
अधिनियम १६४६ चे कलम ३८६ व प्रकरण १८, २२ अंतर्गत महानगरपालिका बाजार व परवाना विभागाचा व्यवसाय परवाना काढून घेण्यासाठी व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.
महानगरपालिका हद्दीत व्यवसाय करीत असताना महापालिकेचा परवाना अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत क्षेत्रीय कार्यालयात परवाना काढून घ्यावा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा क्षेत्रीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या नोटिसीत दिला आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शहरातील व्यापाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment