सत्ताधाऱ्यांना मिळाली आयती संधी, अजित पवारांना 'त्या' विधानावरून घेरणार, - latursaptrangnews

Breaking

Monday, January 2, 2023

सत्ताधाऱ्यांना मिळाली आयती संधी, अजित पवारांना 'त्या' विधानावरून घेरणार,

 


सत्ताधाऱ्यांना मिळाली आयती संधी, अजित पवारांना 'त्या' विधानावरून घेरणार,


अहमदनगर :छत्रपती संभाजी महाराज यांच्‍याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍यांचा निषेध करण्‍यासाठी भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने उद्या सोमवारी राज्यभर मोर्चे काढण्यात येणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील मोर्चा महसूलमंत्री राधकृष्ण विखे पाटील यांचा नेतृत्वात शिर्डीत काढण्यात येणार आहे.

विविध नेत्यांनी महापुरुषांबद्दल केलेली वक्तव्ये राजकीय मुद्दा बनून गाजत आहेत. सत्ताधारी मंडळींविरुद्ध विरोधकांनी याच मुद्द्यावरून रान पेटविले आहे. त्यातच पवार यांच्या विधानाची आयतीच संधी सत्ताधारी मंडळींना मिळाली आहे. त्यामुळे केवळ निषेध करण्यापेक्षा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय भाजपने घेल्ल्याचे दिसून येते



शिर्डीतील मोर्चाबद्दल भाजपचे तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्‍हते असे अवहेलना करणारे वक्‍तव्‍य केले. त्‍यांच्‍या वक्‍तव्‍यामुळे शिवप्रेमींच्‍या भावना दुखावल्‍या गेल्‍या आहेत. या वक्‍तव्‍याबद्दल त्‍यांनी माफी मागावी, अशी मागणी समाजघटकांतून पुढे आली आहे. त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध करण्‍यासाठी भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने सोमवारी २ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २.३० वाजता महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली आणि उत्‍तर अहमदनगर जिल्‍ह्याचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्‍या उपस्थितीत शिर्डी शहरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले आहे.

शहरातील साई आश्रमापासून निघणाऱ्या या मोर्चात भारतीय जनता पक्षाच्‍या वि‍विध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी कार्याकर्त्‍यांसह तालुक्‍यातील कार्यकर्ते, सर्व संस्‍थाचे पदाधिकारी, युवक व महिला कार्यकर्त्‍या आणि शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्‍येने सहभागी होवून प्रशासनास निवेदन सादर करणार आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्‍या वक्‍तव्‍यावरुन समाजातील विविध घटकात तिव्र पडसाद उमटत आहेत. वास्‍तविक पवारांनी त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याबद्दल माफी मागीतली पाहिजे होती. परंतु, तसे काहीच न घडल्‍यामुळेच कार्यकर्त्‍यांना आता रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्‍याची वेळ आली आहे. त्‍यामुळेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्‍यांनी मोठ्या संख्‍येने या आंदोलनात सहभागी व्‍हावे असे आवाहन शिर्डी शहर अध्‍यक्ष सचिन शिंदे, प्रदेश प्रतिनिधी नितीन कापसे, नंदकुमार जेजूरकर, ओबीसी मोर्चाचे जिल्‍हाध्‍यक्ष बाळासाहेब गाडेकर, किसान मोर्चाचे बाबासाहेब डांगे, भाजयुमोचे तालुका अध्‍यक्ष सतिष बावके व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.




No comments:

Post a Comment