दिवसभरातील ताज्या घडामोडी





 (दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका  क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk 


🗣️ चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना इच्छुक :


26 फेब्रुवारीरोजी कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. चिंचवड मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेने लढवावी, अशी आमची इच्छा असल्याचे आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तर, कसबा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा हे दोन पक्ष निर्णय घेतील, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली. कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात उद्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. त्यात या पोटनिवडणुकीसंदर्भात सर्व अंतिम निर्णय घेतले जातील, असे राऊत यांनी सांगितले.


👀 आमदार संतोष बांगर यांची प्राचार्यांना मारहाण :


शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हिंगोलीतील महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संतोष बांगर यांनी मारहाण केली आहे. 3-4 दिवसांपूर्वीच्या घटनेचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. व्हिडिओत हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर हे मारहाण करत आहेत. 


📣 राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा :


राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह चार पोलिसांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' मिळालं आहे. याशिवाय 31 जणांना पोलीस शौर्यपदक तर 39 जणांना 'पोलीस पदक' जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे आज या पुरस्कार जाहीर झाले आहेत.


😎 मंत्रिमंडळ विस्तारांवर चर्चा नाही पण... :


अमित शाह यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ मीडियाशी संवाद साधला. अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारांवर चर्चा झाली नाही. परंतु, आम्ही योग्यवेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. शाह यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चाच झाली नसल्याचं सांगून फडणवीस यांनी इच्छूक आमदारांचं टेन्शनच वाढवलं आहे.


💁‍♂️ साखर उद्योगासाठी मुख्यमंत्री सरसावले : 


ऊस उद्योगाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडली. साखर उद्योगासमोर असणाऱ्या अडचणी आणि या उद्योगाला सशक्त करण्यासंदर्भातील सकारात्मक बाबींवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावर पुढच्या आठवडाभरातच सकारात्मक निर्णय होईल अशी आमची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post