मुरुड मध्ये भामट्या गुत्तेदारांचा आला उत......! - latursaptrangnews

Breaking

Wednesday, January 25, 2023

मुरुड मध्ये भामट्या गुत्तेदारांचा आला उत......!

 मुरुड मध्ये भामट्या गुत्तेदारांचा आला उत......!







"भामट्या गुत्तेदारांना लागले निराधार कमिटीचे डोहाळे"


मुरुड प्रतिनिधी (श्रीकांत टिळक) : - मुरुड ग्रामपंचायतची निवडणूक काही दिवसापूर्वी पार पाडली या निवडणुकीमध्ये मुरुड परिवर्तन पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले यामध्ये मुरुड परिवर्तन पॅनलचे सरपंच अमृता नाडे विजयी  झाल्या तसेच एकूण १७ सदस्या पैकी १६ सदस्य निवडून आले व इतर  पॅनल मधील  एक महिला उमेदवार निवडून आली. मुरुड मध्ये विकास काम करण्यासाठी जसे की नाल्या असतील, रस्ते असतील, सभागृह असतील किंवा पाण्याची पाईप लाईन टाकायची असेल किंवा कोणाला प्लॉट द्यायचा असेल या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याच्या मर्जीतले त्यांच्या आजूबाजूला भटकणारे कार्यकर्ते किंवा जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारीही नाहीत आणि कार्यकर्तेही नाहीत  अशा गुत्तेददारांचा मुरुड मध्ये सर्वात जास्त ऊत आला . वेळीच मुरुडकरानी अशा भामट्या गुत्तेदरापसून सावध राहण्याची वेळ आली आहे.


कधी नव्हे ते मुरुड मध्ये पहिल्यांदाच बहुमतांमध्ये सत्तांतर झाले आणि मुरुड परिवर्तन पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले या दृष्टिकोनातून गेल्या काही दिवसांमध्ये तहसीलदारांनी मुरुड ग्रामपंचायत मध्ये बैठक घेऊन उपसरपंचाची निवड केली होती. अशातच निवड झाल्यानंतर पक्षांतर्गत वाद झाला होता पक्षाने एकास उपसरपंच पदाच्या नावाची शिफारस केलेली असताना पक्ष नियम डावलून जो निर्णय घेतला आहे .असो तो विषयच संशोधनाचा ठरलेला आहे.

 तसेच ग्रामपंचायतची मासिक बैठक ही पार पाडली या मासिक बैठकीमध्ये कमीट्यावरून कुणाला चेअरमन करायचे कुणाला नाही यावरून ग्रामपंचायत सदस्यात खदखद निर्माण झालेली आहे तर काही सदस्य मात्र मागील काही अव्वशे-नवसे आणि काही गुत्तेदार यांच्याशी संपर्क करतानाही दिसून आली आहे. इकडले रस्ते तिकडे करा ! म्हणूनही आग्रही आहेत.तसेच काही ग्रामपंचायत सदस्याची नाराजी ही दिसून येत आहे.


  या ग्रामपंचायतच्या सदस्यांचे कार्यकर्ते जे की स्वतःलाच आज सरपंच समजून मुरुड मधील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन सांगत आहेत की, तुमच्या घराचा रस्ता आम्ही करू, तुमच्या घराला पाईपलाईन आम्ही टाकून देऊ, तुम्हाला राहण्यासाठी जागा मिळवून देऊ, तसेच तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देऊ आणि सदरील हे कार्यकर्ते जिल्हा परिषदे मध्ये जाऊन निवेदन देऊन आम्हीच निधी आणू आणि गावात आम्हीच कामे करू असे सांगत फिरत आहेत. 

तसेच या भामट्यां कार्यकर्त्यांना तालुक्याच्या निराधार कमिटीवर सदस्य किंवा सभापती पदावर निवड करतील याचेही डोहाळे लागले आहेत. काहीजण तर या पक्षाचे सदस्य सुद्धा नाही तरीसुद्धा आम्हाला निराधार कमिटीवर पाठवून द्या म्हणून सदरील ग्रामपंचायत सदस्यांच्या मागे लागले आहेत. 

अशा नामधारी भामट्या गुत्तेदारांकडे गुत्तेदारीचं परवाना सुद्धा नाही, यांना कामाचा कुठल्याच प्रकारचा अनुभव सुद्धा नाही यांनी कधी नाली बांधली नाही, सिमेंट रोड ,रस्ते बनवले नाही, किंवा यांनी सभागृह सुद्धा बांधलेली नाही मग अशांनी उगाचच मुरुड मध्ये आम्ही गुत्तेदारी करत आहोत आम्ही गुत्तेदार आहोत असे मिरवत फिरत आहेत. अशा गुत्तेदारानी बऱ्याच लोकांना गंडा घालण्याचे ठरवलेलं दिसून येत आहे. अशा गुत्तेदारांना मुरुड ग्रामपंचायत ने वेळीच बाजूला सारले पाहिजे असे सामान्य नागरिकाच्या चर्चा होत आहे,काहीजण मुरुड मध्ये दोन नंबर धंदे करत असून आता त्यांनी गुत्तेदारीमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहे व मुरुड ग्रामपंचायतची सर्व कामे आम्ही करू असे लोकांना सांगत फिरत आहे त्यांनी तर मुरुड ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये मुरुड परिवर्तन पॅनल तसेच या दोन्ही पॅनलचा प्रचार आणि प्रसार केला होता.  आता ते गुत्तेदारीमध्ये प्रवेश करू इच्छितात आणि स्वतःला कामाचा कुठल्याच प्रकारचा गुत्तेदारीचा अनुभव नसताना आता हे ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांची गुत्तेदारीसाठी मनधरणी करताना दिसून येत आहेत.

मुरुड ग्रामपंचायत म्हणजे महाराष्ट्रातली नंबर एकची ग्रामपंचायत सद्यस्थितीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अद्यापही झालेल्या नाहीत .मुरुड ग्रामपंचायत जे काही विकासाच्या संदर्भात ठराव घेईल ते ठराव पंचायत समितीला सादर करील व पुढे निवडून येणारे भावी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच सभापती त्याला मान्यता देतील आणि मग कामास सुरुवात होईल .मग वित्त आयोगातून निधी मिळेल व निधी मिळाल्यानंतर टेंडर निघेल व टेंडर निघाल्यानंतर मग योग्य त्या गुत्तेदाराला काम दिलं जाईल तेव्हा कामास सुरुवात होईल परंतु मुरुड मधील हौसे, नवसे, गवसे, भामटे, लबाड नामधारी गुत्तेदार मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. मात्र नागरिकांमध्ये चर्चेला ऊत आला असून या ठिकठिकाणी या विषयासंदर्भात चर्चा होताना दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment