Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    दिवसभरातील ताज्या घडामोडी










    दिवसभरातील ताज्या घडामोडी 


    ⚖️ सत्तासंघर्षाचा सोक्षमोक्ष 'व्हॅलेंटाइन डे'पासून :


    अवघ्या देशाचे लक्ष असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी घटनापीठाने पुढे ढकलली आहे. आता पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. सुनावणीनंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, 'व्हॅलेंटाइन डे'पासून राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी होणार आहे. सर्व प्रेमाने होईल, असा आमचा विश्वास आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.


    🥶 राज्याला आणखी हुडहुडी भरणार :


    राज्यातील काही भागात थंडीमुळं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं असताना आता तापमानाचा पारा पुन्हा घसरण्याची शक्यता आहे. राज्यभरात येत्या 48 तासांत पुणे, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात हुडहुडी भरणार आहे. थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीनं उत्तर महाराष्ट्र सध्या चांगलाच गारठलाय. 


    🤼‍♀️ पुण्यात आजपासून महाराष्ट्र केसरीचा थरार :


    आजपासून पुण्यात 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा फड रंगणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत 900 हून अधिक पैलवान सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा सुरू होताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी या स्पर्धेवर आक्षेप घेतला. ही स्पर्धा अधिकृत नसल्याचा आरोप केलाय. मात्र या स्पर्धेला भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता असल्यानं ही स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा आयोजकांनी केलाय.


    🗣️ अजित पवारांचा शिंदे सरकारला इशारा :


    खोट्या केस दाखल करणे महाराष्ट्राची परंपरा नाही. खोट्या केस दाखल करणार असतील तर मोगलाई लागल्यासारखे आहे. राजकीय विरोधक आहेत म्हणून कोणी जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केल्यास आम्हीही शांत बसणार नाही. आम्हाला अनेक मार्गांचा वापर करता येतो, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad