सेवापुर्ती निमित्त मुख्याध्यापक गोविंद गुडसुरे यांचा सत्कार

 सेवापुर्ती निमित्त मुख्याध्यापक गोविंद गुडसुरे यांचा सत्कार


महमदापूर :- येथील मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत चालणाऱ्या श्रीराम विद्यालय,श्रीरामनगर महमदापूर शाळेचे विद्यार्थीप्रिय व कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आदरणीय श्री.गोविंद केरबा गुडसुरे हे नियत वयोमानानुसार दि.31/1/2023 रोजी सेवानिवृत्त झाल्याने विद्यालयाच्या वतिने त्यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.सत्काराच्या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी  शाळेच्या प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंत पुष्पवृष्टी करत वाजत गाजत सत्कारमुर्तींचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य प्रशिक्षण आयुक्त भारत स्काऊट  गाईड कार्यालय मुंबई येथील गोंविद केंद्रे व जिल्हा संघटन आयुक्त स्काऊट गाईड कार्यालय लातूर येथील शंकर चामे हे उपस्थित होते.विशेष अतिथी म्हणून मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत चालणाऱ्या सर्व शाळेचे मुख्याध्यापक व महमदापूरचे सरपंच अंकुश बनसोडे,पोलिस पाटील श्रीकृष्ण थोरमोटे,महाळंग्रावाडीचे सरपंच दयानंद दंडीमे,भडी येथील उपसरपंच सूर्यकांत वीर,विविध सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व लोकनेते विकासरत्न स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रतिमांचे पुजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

अध्यक्ष,प्रमुख अतिथी व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतिने पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.विद्यालयाच्या वतीने सत्कारमुर्तींचा शाल श्रीफळ व पुष्पहाराने यथोचित गौरव करण्यात आला.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी विविध भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कारमुर्तींना गौरवीत केले.

प्रास्ताविक बालाजी बिराजदार यांनी केले.विद्यार्थ्यांनी मनोगतांच्या माध्यमातून आठवणींना उजाळा दिला.प्रमुख अतिथींनी गोविंद गुडसुरे यांच्या स्काऊट गाईड चळवळीतील विशेष कामगीरीचा उल्लेख केला.सत्काराला उत्तर देताना सत्कारमुर्तींनी अतिशय भावनिकतेने आपल्या 31 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतील विविध आठवणींना उजाळा दिला व सर्वांचे आभार मानले.प्रकाश देशमुख यांनी अध्यक्षीय समारोप केला.

सुञसंचलन सचिन रणदिवे यांनी तर आभार प्रदर्शन साहेबराव कांबळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रिडाशिक्षक तुकाराम नागरगोजे,सांस्कृतिक विभागप्रमुख वनिता सरवदे,रेवणसिध्द खोसे,सविता देशमुख,रविशंकर मठपती,अनुसया मिटकरी,रमेश सुरवसे,अशोक आडे,बाळासाहेब रोंगे,अहिल्या मिटकरे व ज्योती शेळके व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले.


Post a Comment

Previous Post Next Post