आई मोहत्सवाचे पुर्वरंग ...
आई चा चेहरा समोर ठेवा नक्कीच आयुष्यात यशस्वी व्हाल... रमेश जसवंत
सोयगाव /प्रतिनिधि मुश्ताक शाह
" शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे , जो पिणार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही " डॉ.बाबासाहेबांनी दिलेली शिकवनुक खरी आहे.मी लहान विद्यार्थी अवस्थेत असतांना घरातील परिस्थिती हलाखीची असल्यावरही मनाशी व उराशी धेय बाळगले होते की, भविष्यात लोकांची सेवा करायची म्हणुन ध्येय निश्चितीसाठी शिक्षण घेतले, तहसीलदार पदावर नियुक्ती झाली.माझी आई घरातील लहान मोठ्या मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून मंजुरी करून पै पै जोडून लागणरे शैक्षणिक साहित्य घरातील सर्वांसाठी सकाळी लवकर उठून जेवण,कपडे धुणे आदी दिवसभर हंसऱ्यां चेहऱ्याने राब राब राबून काम करायची आई सारखे वासल्ल जगात कुठेही नाही. मला आजही आईची खुप आठवण येते असे रमेश जसवंत सोयागाव तहसीलदार भाषणात बोलले गुरुवारी जिल्हा परिषद प्रशाला मैदानावर आयोजित " आई " महोत्सव २०२३ कार्यक्रमात त्यांनी अध्यक्षपद भुषविले.
प्रमुख पाहुणे म्हणून गोरखनाथ सुरे सोयगाव नायब तहसीलदार, अनमोल केदार सोयगाव पोलीस निरीक्षक, दादाराव राठोड प्रशालेचे शाळेचे मुख्याध्यापक,सुनिल गुजर कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापक, नगराध्यक्षा आशाताई तडवी, नगरसेवक संध्याताई मापारी, विष्णू मापारी, अनिल इंगळे आणि विजय पगारे, राजेंद्र दुतोंडे,लताताई कांबळे,हभप सुधन्वा महाराज केनेकर,संजय शहापुरकर, दुर्गादास केनेकरसह शालेय शिक्षण समिती सर्व पदाधिकारी, पालक, महीला , विद्यार्थी- विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलतांना जसवंत म्हणाले की, आपल्या भारत देशात संत गाडगेबाबा, संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी संत महात्यांचा देश असुन त्यांनी दिलेली शिकवनुक अंगीकारावी या महापुरुषांनी सुध्दा आईला महत्व दिलेले आहे. तुमचे प्राथमिक शिक्षण सुरू आहे म्हणजे पाया भरणी गेलेली वेळ पुन्हा येत नसते म्हणुन झालेल्या चूका सुधरावयाला निघून जावू नये करीता आभ्यासाची गोडी चिकाटी, मेहनतीच्या व बुद्धी कौशल्य्याने आपले ध्येय गाठा आपली आई व वडील तुमच्या कडून उज्ज्वल भवितव्यासाठी अपेक्षा करतात.आईला कमी लेखु नका कारण शेती व्यवसायाचा शोध स्रीयांनीच लावलेला आहे बि बिजवाई जमा करून पुर्वी त्यापासून रोप बनली जात होती प्रगती होत होत कालानुरूप पुढे शेती पिकायला लागली स्री ही शक्ती स्वरूप आहे.आईचा चेहरा समोर ठेवून यशस्वी व्हाल असेही तहसीलदार जसवंत बोलले....!
अनमोल केदार सोयगाव पोलीस निरीक्षक,सुनिल गुजर कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापक, हभप सुधन्वा महाराज केनेकरस, यांनी सुध्दा यावेळी आई विषयांवर मोलाचे मार्गदर्शन करतांना बाळकडू ज्ञानार्जन दिले.
दरम्यान जिल्हा परिषद प्रशाला सोयगावचे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील एन.एम.एम.एस.परिक्षेत इयत्ता आठवीचे सहा विद्यार्थी प्रफुल्ल चव्हाण , आकांक्षा फुसे ,यश गाजरे , वैभव मंडवे ,कशिश इंगळे , गायत्री घन उत्तीर्ण झाल्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत तहसीलदार जसवंत यांचे हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येवून गौरविण्यात आले.