पोलिसांच्या वर्दीत आला, विनाअडथळा आत गेला अन् अनर्थ घडला, ११० जणांनी जीव गमावला - latursaptrangnews

Breaking

Thursday, February 2, 2023

पोलिसांच्या वर्दीत आला, विनाअडथळा आत गेला अन् अनर्थ घडला, ११० जणांनी जीव गमावला

 


पोलिसांच्या वर्दीत आला, विनाअडथळा आत गेला अन् अनर्थ घडला, ११० जणांनी जीव गमावला


लाहोर : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दोन दिवसांपूर्वी एका मशिदीत आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला होता. त्या स्फोटात १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी खैबर पख्तनख्वा पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली आहे. पोलीस अधिकारी मोअज्जम जाह अन्सारी यांनी आत्मघातकी बॉम्बस्फोटाच्या मागं जे नेटवर्क आहे त्यांचा छडा लावण्यात यश येईल, असं सांगितलं. मशिदीत आत्मघातकी बॉम्बस्फोट करणारी व्यक्ती पोलिसांच्या वर्दीत आली होती. त्यामुळं त्या व्यक्तीवर कुणीही संशय घेतला नाही, त्याची तपासणी झाली नाही आणि तो मशिदीत पोहोचला.


३० जानेवारीला पेशावरच्या पोलीस लाइन मधील मशिदीत आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. त्यामध्ये १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. मशिदीत नमाज सुरु असताना हल्लेखोर आत घुसला आणि त्यानं स्वत: ला उडवून दिलं. ही घटना घडली त्यावेळी मशिदीत ३०० ते ४०० लोक उपस्थित होते. बॉम्बस्फोटात मृत्यू झालेल्या आणि जखमींमध्ये पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. त्या स्फोटात मशिदीची भिंत कोसळली. त्याखाली दबून काही जणांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना तहरीक-ए- तालिबाननं या स्फोटाची जबाबदारी घेतली होती. मात्र, नंतर त्यांनी हात झटकले.

डॉनच्या रिपोर्टनुसार मोअज्जम जाह अन्सारी यांनी पोलिसांना घटनास्थळी एक जॅकेट आढळलं त्यामध्ये बॉल बेअरिंग होतं, असं सांगितलं. मशिदीजवळच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता हल्लेखोर पोलिसांच्या वर्दीत आला होता. दुचाकी पार्क करताना तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हल्लेखोरानं दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी मेन गेटमधून दुचाकीवरुन प्रवेश केला. तो आला त्यावेळी एका पोलीस कॉन्स्टेबला मशिदी कुठं आहे अशी माहिती विचारली. त्यामुळं हल्लेखोराला टार्गेट देण्यात आलं होतं हे स्पष्ट झाल्याचं पोलिसांनी म्हटलं.

पेशावर मशीद हल्ल्यामागं नेटवर्क कार्यरत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी दुचाकीचा देखील शोध लावल्याची माहिती दिली आहे. स्फोटासाठी टाइनाइट्रोटोलुइन वापरण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 


बॉम्बस्फोटात ज्या पोलिसांचा मृत्यू झाला त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही आम्ही बॉम्बस्फोटाचा बदला घेऊ, असं पोलिसांकडून

No comments:

Post a Comment