बेळंबे फाऊंडेशनच्यावतीने आयोजित विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद - latursaptrangnews

Breaking

Tuesday, February 28, 2023

बेळंबे फाऊंडेशनच्यावतीने आयोजित विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद



 बेळंबे फाऊंडेशनच्यावतीने आयोजित विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

लातूर ः गेल्या अनेक वर्षापासून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या बेळंबे फाऊंडेशनच्यावतीने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.  हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थीनींनी गर्दी केली होती. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून येथील बेळंबे फाऊंडेशनच्यावतीने मंगळवारी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ.अजय महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बेळंबे फाऊंडेशनचे अध्यक्ष अशुतोष बेळंबे, प्रा.अनुराधा बेळंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. 28 फेब्रुवारी 1967 पासून देशात सर्वत्र राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून बेळंबे फाऊंडेशनने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले विज्ञान प्रदर्शन हा उपक्रम स्तुत्य असल्याचे यावेळी डॉ.महाजन म्हणाले. विज्ञानामुळे अनेक गोष्टी शक्य झाल्या असून बेळंबे परिवाराने विज्ञान आणि शिक्षण क्षेत्र सोडू नये अशी अपेक्षा यावेळी डॉ.महाजन यांनी यावेळी व्यक्त केली. प्रा.अनुराधा बेळंबे यांनी प्रास्ताविकात बेळंबे फाऊंडेशनच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी सहशिक्षक व्ही.बी.लखनगिरे यांनी बेळंबे फाऊंडेशनच्यावतीने त्यांच्या शाळेस होत असलेल्या सहभागाची माहिती देवून आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी वसंतराव बेळंबे यांच्या हस्ते डॉ.अजय महाजन यांचा सत्कार करण्यात आला.
या विज्ञान प्रदर्शनास जिल्ह्यातील 25 शाळांनी सहभाग नोंदविला होता. जवळपास 250 विद्यार्थ्यांनी 128 प्रयोगाची मांडणी केली होती. कार्यक्रमास डॉ.अशोक बेळंबे, सुबोध बेळंबे, नारायण वाझे, अशुतोष बेळंबे, आकाश रोपडेकर, सुशिल बेळंबे, श्रीकांत बेळंबे, सुहास बेळंबे, सौ.रशमी बेळंबे, अपुर्वा बेळंबे, डॉ.एैश्‍वर्या बेळंबे, तेजस बेळंबे, संकेत बेळंबे यांच्यासह बेळंबे परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते. या प्रदर्शनाला जवळपास 2 हजार विद्यार्थ्यांनी सहभागी होवून प्रदर्शनातील विविध वैज्ञानिक उपक्रमाची माहिती घेतली. याप्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन संजय जेवरीकर यांनी केले.

No comments:

Post a Comment