‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त आयोजित स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रथम - latursaptrangnews

Breaking

Thursday, February 16, 2023

‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त आयोजित स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रथम

मुंबई, दि. १५ : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे निकाल मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. यात बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि तृतीय क्रमांक भिंवडी-निजामपूर महानगरपालिका यांना जाहीर झाला आहे.

वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने मराठी, अमराठी लोकांमध्ये मराठी बाबत आपुलकी वाढीस लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून सर्व महानगरपालिका स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

“महाराष्ट्राची राजभाषा मराठी” या विषयाच्या अनुषंगाने मराठी, अमराठी लोकांमध्ये मराठीबाबत आपुलकी वाढीस लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून अभिनव कल्पनेच्या आधारे जसे की, अभिनव कल्पनेत संगीत, छायाचित्रीकरण, रेखाचित्रे, घोषवाक्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विषय मांडणी इत्यादी विविध माध्यमांचा उपयोग करुन महानगरपालिका क्षेत्रातील अधिकारी – कर्मचारी यांनी वरील माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना शिक्षित करावयाचे अपेक्षित होते. स्पर्धेत महानगरपालिकेच्या कमीत कमी १० अधिकारी/कर्मचारी यांनी भाग घेणे आवश्यक होते. २७ महानगरपालिकांपैकी ८ महानगरपालिकांचे प्रस्ताव विहित मुदतीत प्राप्त झाले होते.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ/



from महासंवाद https://ift.tt/k7iftYL
via IFTTT https://ift.tt/JbhlgH9

No comments:

Post a Comment