मामाचा भाचीवर बळजबरी,



मामाचा भाचीवर बळजबरी,


बीड: केज तालुक्यातील एका आदिवासी कुटुंबातील आई-वडील हे आपल्या कामानिमित्त बाहेर गेले असता आपल्याच नात्यातील एका नराधमाने त्यांच्या मुलीवर अत्याचार केला. ही घटना मुलीने तब्बल चार दिवसानंतर आईला सांगितल्यानंतर आईच्या पायाखालची जमीन हादरली. त्यानंतर आईच्या डोक्यात विचारांचे काहूर उठले. आपल्याच समाजात आपली नाचक्की होऊ शकते, आपली इज्जत जाईल, या भीतीने मुलीच्या आईने घरातील एका अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, केज तालुक्यातील एका आदिवासी वस्तीवरील आई-वडील कामाला गेले ते पाहून एका अल्पवयीन मुलीवर त्यांच्या जवळच्या नात्यातील व्यक्तीने घरात कोणी नसताना पाहून अत्याचार केला. मात्र, यावर ती अल्पवयीन मुलगी चार दिवस शांत राहिली. अखेर त्रास असह्य झाल्याने तिने आईला याविषयी सांगितले. आईने तिला सविस्तर प्रसंग विचारला असता याविषयी मुलीने आईजवळ झालेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला. हे सगळं ऐकून आईच्या पायाखालची जमीन हादरली. त्यानंतर आईने याविषयी मुलीच्या वडिलांना सांगून आपल्या नातेवाईकांशी बोलायला सांगितलं. मात्र, यावेळेस नातेवाईकांनी हा सगळा प्रकार ऐकून घेतला. ज्या व्यक्तीने हे कुकर्म केलं त्याला फोन लावून याविषयी विचारणा केली असता त्यावर त्या व्यक्तीने म्हणजेच त्या मुलीच्या मामाने स्वतःच्या बहिणीला गप्प राहण्यास सांगितले. आता फक्त तुझ्या मुलीवर अत्याचार झाला आहे. कुठे या गोष्टीविषयी वाचता केलीस तर तुझ्यावर देखील अशी वेळ येऊ शकते, अशी धमकी त्याने दिली.
या सगळ्यामुळे मुलीच्या आईच्या मनावर मोठा आघात झाला. याच तणावात असताना मुलीच्या आईने पत्र्याच्या खोलीतील एका अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. समाजाता आपली नाचक्की होईल, या भीतीने मुलीच्या आईने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र, या घटनेनंतर स्वतःच्या पत्नीचा मृतदेह घरातील अडुला सापडल्यानंतर पतीच्या पायाखालची अधिकच जमीन हादरली. यानंतर पतीने निर्भीड होत पोलीस ठाण्यात याविषयी माहिती देत पोलिसांना कळवत घटनेची माहीती दिली.

पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करून केज येथील प्राथमिक रुग्णालयात मृतदेह पाठवून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. पीडित मुलीचे वडील आणि मयत व्यक्तीचे पती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन व्यक्ती विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणचा तपास पिंक पथकाकडे देण्यात आला आहे. या घटनेमुळे आदिवासी वस्तीसह केज तालुक्यासह बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post