निदर्शने ः मागण्या मान्य करा अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल
लातूर दि.23-02-2023
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर बोर्डाने इंग्रजी विषयाच्या नियमकाची बैठक गुरूवारी घेण्यात आली, मात्र राज्यभर (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचे समोर आले आहे. त्यामुळे लातूर विभागीय मंडळात बोर्डाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांना विविध मागण्याचे निवेदन देऊन शिक्षक नियमकांच्या बैठकीवर बहिष्कार टाकून जुक्टा संघटनेतर्फे निषेध नोंदविण्यात आला.
निवेदनातील मागण्यामध्ये अंशतः अनुदानीत कमविना प्रचलित टप्पा अनुदान आदेश काढावा, अघोषीत कमविना घोषीत करून अनुदान आदेश काढावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, वाढीव पदांना मान्यता द्यावी, निवड श्रेणी वीस टक्क्याची अट रद्द करून सरकट द्यावी, अंशतः अनुदानित वरून अनुदानीतवरती बदली आदेश काढावा, शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, प्रयोगशाळा सहाय्यक पदांना वैयक्तीक मान्यता द्यावी अशा विविध मागण्याचा समावेश आहे. या मागण्यांचे निवेदन देऊन कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी बहिष्कार जाहीर केला. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष प्रा.विलास जाधव उ.बाद जुक्टाचे अध्यक्ष प्रा.रमेश नन्नवरे, लातूर जुक्टाचे अध्यक्ष प्रा.शिवराम सूर्यवंशी नादेंड जुक्टाचे अध्यक्ष प्रा .संभाजी वडजे, सचिव प्रा. बाळासाहेब बचाटे, कार्याध्यक्ष प्रा.संजय भंडारे, सचिव प्रा. प्रशात भागवत, जिल्हा सचिव प्रा.गाढवे, उपाध्यक्ष प्रा. मारुती सूर्यवंशी, उपाध्यक्ष प्रा. सी.जी पाटील, कार्यालयीन सचिव प्रा. राजेंद्र नागरगोजे कोषाध्यक्ष प्रा.एकनाथ पाटील, प्रा. नरहरी जाधव, प्रा. श्रद्धा मिसर, प्रा. नागेश डुमणे आदीसह इंग्रजी विषयाचे नियामक व शासनाने शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करून मंडळासमोर घोषणा देऊन बैठकीवर बहिष्कार घातला. यावेळी लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यातील जुक्टा संघटनेचे पदाधिकारी व प्राध्यापक मोठ्या संख्यने उपस्थित होते.