दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी


दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी




⚡ *रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल* :


झारखंडचे राज्यपाल आणि माजी केंद्रीय मंत्री रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनले आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रायपूर महानगरपालिका, मध्य प्रदेश विधानसभा आणि नंतर लोकसभेत प्रतिनिधित्त्व केलेले रमेश बैस सध्या झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत होते. रमेश बैस यांनी छत्तीसगडमधील रायपूरचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत.


💁‍♂️ *राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर* :


महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. याशिवाय गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री शिव प्रताप शुक्ला यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल करण्यात आले आहे.


🏏 *महिला T20 वर्ल्डकप आज भारत-पाकिस्तान भिडणार* :


महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर संध्याकाळी 6.30 वाजता सामना सुरू होईल. दोघांमध्ये आतापर्यंत 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारताने 10 जिंकले तर केवळ 3 सामन्यात पराभव पत्करला. भारताच्या सामन्यानंतर रात्री 10.30 पासून ग्रुप-1 मध्ये श्रीलंका आणि बांगलादेशचा सामनाही रंगणार आहे. 


👀 *...म्हणून बाहुबली फेम 'भल्लालदेव' अडचणीत* :


भल्लालदेव म्हणजे राणा दग्गुबाती व त्यांचे वडील सुरेश बाबू अडचणीत सापडलेत. त्यांच्यावर हैदराबादेतील एका व्यावसायिकाने धमकी देऊन भूखंड बळकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद कुमार नामक व्यावसायिकाने हैदराबादच्या फिल्म नगर स्थित पोलिस ठाण्यात राणा दग्गुबाती व सुरेश बाबू यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता पुढे कोणती कारवाई होते? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

 

🎬 *आज रंगणार बिग बॉस 16 चा फिनाले* : 


बिग बॉस 16 च्या महाअंतिम सोहळ्याची प्रतीक्षा आता संपली आहे. आज संध्याकाळी या सीझनचा विजेता घोषित केला जाणार आहे. विजेपदासाठी शिव ठाकरे, प्रियांका चौधरी आणि एमसी स्टॅन यांच्यात तगडी टक्कर होणार असल्याचं बोललं जात आहे. मराठी बिग बॉस सीझन 2 चा विजेता शिव ठाकरे आता बिग बॉस 16 च्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र सद्यस्थितीला कोणतीही शक्यता वर्तवणं कठीण आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post