👀 सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी मंगळवारी :
राज्यातील सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च सुनावणीत आज सलग तिसऱ्या दिवशीही ठाकरे गटाच्या वकीलांनी बाजू मांडली. आज सुरुवातीला ठाकरे गटाकडून अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. अॅड. कपिल सिब्बल यांनी अडीच दिवस जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर अॅड. अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. आता पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.
⚖️ सत्तासंघर्षावर मार्चच्या पहिल्या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता :
अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो, अशी महत्त्वाची माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. आज दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना अनिल देसाई यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
😎 भावी महिला मुख्यमंत्री बॅनरवरुन सुप्रिया सुळे कडाडल्या :
खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो भावी मुख्यमंत्री म्हणून लावण्यात आला. त्या फोटोवरुन सुप्रिया सुळे चांगल्याचं कडाडल्या आहेत. महिलेचा फोटो कुठेही वापरता येत नाही आणि फोटो लावण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्यातील गावभेटीच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्या बोलत होत्या.
🚨 काँग्रेस नेते पवन खेरा यांना दिल्ली विमानळावर अटक :
रायपूर येथे काँग्रेसच्या अधिवेशनाला निघालेले काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. एक दिवसापूर्वी आसाम पोलिसांनी त्यांच्यावर दिमापूरमध्ये जातीय तेढ आणि राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात गुन्हा दाखल केला होता.
💁♂️ खिलाडी अक्षय कुमारचे 'सेल्फी'साठी हटके प्रमोशन :
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या आगामी सेल्फी या चित्रपटासाठी हटके प्रमोशन केले आहे. या प्रमोशनच्या निमित्ताने त्याने चक्क एक नवा विक्रम रचला आहे. फॅन्स मीट अँड ग्रीट या कार्यक्रमाच्या निमित्ताने अक्षय खास चाहत्यांच्या भेटीसाठी आला होता. या कार्यक्रमात त्याने तीन मिनिटांत तब्बल 184 सेल्फी काढले. त्याच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.