दिवसभरातील ताज्या घडामोडी
⚡ महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहीरात प्रसिद्ध :
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील 673 पदांकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2023, दि. 4 जून 2023 रोजी ही परीक्षा होईल.
👀 नामांतराची प्रक्रिया सोमवारी पूर्ण होईल : देवेंद्र फडणवीस :
केवळ औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले नाही, तर तालुका, जिल्ह्याचेही नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. त्याबाबत केवळ औपचारिकता बाकी आहे. सोमवारपर्यंत याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
😎 मराठा मुख्यमंत्री व्हावा म्हणून मी गद्दारी केली... :
गुलाबराव गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली", असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना जोरदार प्रत्यूत्तर दिले.जळगावात जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. बंडखोरीनंतर शिंदे गटातील नेत्यांवर गद्दार असा आरोप होतो. या आरोपांवर गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
🗣️ नामांतरावर इम्तियाज जलील यांचे मोठे विधान :
औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार तथा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी औरंगाबाद शहराच्या नामांतराला याआधीही विरोध केला होता. भविष्यातही आम्ही याला विरोधच करणार, असे जलिल म्हणाले. आमचा छत्रपती संभाजी महाराज यांना विरोध नाही. भविष्यताही त्यांच्या नावाला विरोध करणार नाही, असंही ते म्हणाले.
💥 RBI चे महाराष्ट्रातील 2 सहकारी बँकांवर निर्बंध :
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सध्या नियमांची अवहेलना करणाऱ्या बँकांवर कठोर भूमिका घेतली आहे. रिझर्व्ह बँकेने काल म्हणजे शुक्रवारी 5 सहकारी बँकांवर पैसे काढण्यासंबंधीचे कठोर निर्बंध लादले. यात महाराष्ट्रातील 2 सहकारी बँकांचा समावेश आहे. यातील एक बँक औरंगाबाद येथील आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786